चायनीज मोबाईल कंपनी विवोने आयपीएल प्रायोजकत्वातून माघार घेतल्यामुळे आता आयपीएल २०२० साठी नवीन प्रायोजकाचा शोध वेगाने सुरु झाला आहे. बीसीसीआयने सोमवारी (१० ऑगस्ट) आयपीलच्या १३ व्या हंगामासाठी टेंडर (निविदा) मागविले होते. सोबतच बीसीसीआयने या कंपन्यांसाठी काही नियम- अटीही ठेवल्या आहेत.
बीसीसीआयने सोमवारी एक निवेदन जारी केले. सचिव जय शाह यांची १३ मुद्यांच्या या अधिसूचनेवर सही आहे. सर्वसाधारणपणे, कोणत्याही निविदा प्रक्रियेत सर्वोच्च बोली लावणाऱ्यांना यश मिळते. परंतु आयपीएलच्या प्रायोजकत्वामध्ये सर्वाधिक बोली लावणाऱ्यांनाच अधिकार दिले जाणे आवश्यक नाही.
नवीन टायटल प्रायोजकाचा करार साडे चार महिन्यांचा असणार आहे. १४ ऑगस्टपर्यंत अर्ज जमा केले जातील आणि प्राप्तकर्त्याचे नाव १८ ऑगस्ट रोजी जाहीर केले जाईल. हे अधिकार १८ ऑगस्ट २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी असतील.
बीसीसीआयनुसार मागील ऑडिट खात्यांनुसार ज्या कंपन्यांच्या निविदा ३०० कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या आहेत अशाच कंपन्यांच्या निविदा स्वीकारल्या जातील. तपासलेल्या खात्यांची प्रतदेखील बोलीसोबत जमा करावी लागेल.
बोर्डाने स्पष्ट केले की, मध्यस्थी किंवा एजंट या प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाहीत आणि अशाप्रकारच्या बोली रद्द केल्या जातील. सोबतच केवळ बीसीसीयच नाही तर याचे अधिकारी, कर्मचारी किंवा एजंट कोणत्याही परिस्थितीत किंमत, देणगी, नुकसान किंवा कोणत्याही प्रकारच्या खर्चासाठी जबाबदार असणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा
-पाकिस्तानी क्रिकेटर म्हणतोय, मला थेट आयोध्येत येऊन घ्यायचे आहे प्रभू रामचंद्रांचे दर्शन
ट्रेंडिंग लेख-
-बीसीसीआयच्या दबावामुळे ‘हे’ ३ भारतीय क्रिकेटर लवकरच करणार क्रिकेटला टाटा बाय बाय
-थेट विरोधी संघातील गोलंदाजाला सेहवागने दिली होती ऑफर; बाऊंसर टाकू नको, रात्री पार्टी देतो
-चालू सामन्यात गाण्याचे शब्द आठवत नव्हते म्हणून सेहवागने थेट १२व्या खेळाडूला बोलावलं होतं मैदानात






