मुंबई । भारतातील हिंदूंचे तीर्थस्थान अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी पायाभरणी केली आणि त्या जागेची पूजा केली. दुसरीकडे, पाकिस्तानकडून खेळलेला हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाने राम मंदिराबाबत आपली इच्छा व्यक्त केली आहे.
एका टीव्ही चॅनेलला कनेरियाने सांगितले की, “जर संधी मिळाली तर मी नक्कीच अयोध्येत जाऊन रामलिला पाहिन. मी एक हिंदू आहे आणि भगवान रामचा भक्त आहे. भगवान राम यांनी बोलावले तर ते नक्कीच तेथे जाईन.”
कनेरिया यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, ”आमच्यासाठी हे एक धार्मिक स्थळ आहे आणि जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच अयोध्येत येऊ इच्छितो. मी एक भक्त हिंदू आहे आणि मी नेहमी भगवान रामने दाखविलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतो.”
The beauty of Lord Rama lies in his character, not in his name. He is a symbol of the victory of right over the evil. There is wave of happiness across the world today. It is a moment of great satisfaction. #JaiShriRam pic.twitter.com/wUahN0SjOk
— Danish Kaneria (@DanishKaneria61) August 5, 2020
अलीकडेच 39 वर्षीय कनेरियाने पाकिस्तान संघावर भेदभावाचा आरोप केला होता. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला होते की, पाकिस्तानचे काही क्रिकेटपटू या गोलंदाजाशी चांगले वागले नाही. अख्तरने असा दावा केला होता की, काही क्रिकेटपटूंनी कनेरिया हिंदू असल्याने त्याच्यासोबत जेवण केले नाही. यानंतर कनेरियानेही पुढे येऊन अख्तरच्या मताला सहमती दर्शविली आणि पाकिस्तान क्रिकेटवर भेदभावाचा आरोप केला.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात खेळणारा कनेरिया दुसरा हिंदू खेळाडू आहे. तो एकूण 79 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून यात 61 कसोटी आणि 18 वनडे सामन्याचा समावेश आहे. या दरम्यान त्याने कसोटी सामन्यात 261 आणि वनडे सामन्यात 15 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज






