परिस्थिती अत्यंत बेताची. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत. झोपडीत राहून मोठा झालेला. पैसे नसल्याने दहावीनंतरच शिक्षणापासून दूर गेला. घर चालविण्यासाठी त्याची आई रस्त्यावर शेंगा विकायची. अनेक रात्री तो रस्त्यावर राहून काढयाचा. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कचरा वेचण्याचे काम करु लागला. परिस्थितीशी दोन हात करत अखेर क्रिकेटमुळे त्याचा नशीबाचा दरवाजा उघडला आणि आयुष्य बदलले. ही संघर्षमय कहाणी आहे वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याची.
एकेकाळी झोपडीत राहणाऱ्या ख्रिस गेलकडे आज जमैकाची राजधानी किंग्स्टन येथे आज अलीशान घर आहे. आपल्या स्फोटक खेळीने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. 1988/99 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर त्याचवर्षी त्याला लगेच वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. त्यानंतर त्याने पाठीमागे वळून पाहिले नाही.
अत्यंत कष्टातून वर आलेल्या ख्रिस गेलला पुन्हा एकदा संकटाने घेरले. सहा वर्षांनंतर त्याच्या हृदयाला होल असल्याचे समजले. त्यानंतर तो बिनधास्तपणे क्रिकेट खेळू लागला. आपल्या स्फोटक खेळीने क्रिकेटची परिभाषा बदलून टाकला. आक्रमक खेळीने चाहत्यांना विलक्षण आनंद दिला. आंतरराष्ट्रीय टी 20 मधला तो सर्वात खतरनाक खेळाडू आहे. अनेक स्फोटक खेळीने त्याने जगभर आपले चाहते निर्माण केले.
गेलने टी 20 क्रिकेटमधे 13 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात 22 शतकांचा समावेश आहे. टी 20 क्रिकेटमध्ये 978 षटकार ठोकले. वेस्ट इंडिजकडून क्रिकेट खेळताना 103 कसोटी सामन्यात 42 च्या सरासरीने 7214 धावा केल्या. वनडेत 10,480 धावा त्याच्या नावावर आहेत. त्यात 25 शतके ठोकली. विश्वचषकात ख्रिस गेलने द्विशतक ठोकण्याचा देखील कारनामा केला आहे.