दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाच्या (डीडीसीए) येत्या निवडणुकांमध्ये बीसीसीआयचे माजी कार्यकारी अध्यक्ष डॉ. सीके खन्ना ग्रुप यांनी अध्यक्षपदासाठी रोहन जेठलीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहन हा भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचा मुलगा आहे. CK Khanna Group Supports Arun Jaitley’s Son Rohan For DDCA President Seat
सीके खन्ना ग्रुपचे प्रवक्ता मंजीत सिंग यांनी म्हटले आहे की, “रोहनसोबत झालेल्या काही बैठकींनंतर हे स्पष्ट झाले आहे की, त्याच्यामध्ये क्रिकेट आणि डीडीसीएसाठी एक स्पष्ट दृष्टिकोन आणि योजना आहे. त्याचा क्रिकेटबद्दलचा दृष्टिकोन आणि योजनांविषयी ऐकून ग्रुपला खात्री पटली आहे की, डीडीसीएच्या अध्यक्षपदासाठी रोहन हा एक आदर्श आणि उपयुक्त अमेदवार आहे.”
सीके खन्ना ग्रुपने कोषाध्यक्ष पदासाठी शशी खन्ना यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. चार संचालक (सदस्य शीर्ष परिषद) पदासाठीच्या उमेदवारांची लवकरच घोषणा करण्यात येईल. सीके खन्ना यांनी म्हटले की, “उर्वरित लोकांनी अगोदरच रोहनला समर्थन दिले आहे. तसेच आता आमच्या समर्थनानंतर त्याचे डीडीसीए अध्यक्ष बनणे निश्चित आहे. असे असले तरी, निवडणुक प्रक्रिया कधी सुरु होईल, यावर शंकेचे सावट पसरले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-एकवेळी धोनीवर दंड ठोठावणारा पंचच आता म्हणतोय धोनी जगातील सर्वात हुशार क्रिकेटपटू
-सिक्सरकिंग मैदानावर परतण्यास उत्सुक; म्हणतो, ‘मला आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळायचे’
-आयपीएलमध्ये मिळाली नाही संधी आता निवृत्तीनंतर एलपीएल मध्ये खेळणार ‘हा’ भारतीय खेळाडू
ट्रेंडिंग लेख –
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही