भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा त्याच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील वागणुकीमुळे नेहमी चर्चेत असतो. जडेजाच्या जीवन संघर्षाची कहानी जेवढी प्रेरणादायी आहे, तेवढेच त्याचे जीवन वादांनी भरलेले आहे. नुकतेच जडेजा व त्याची पत्नी रिवा सोलंकी एका वादात सापडले होते. Controversies Of Ravindra Jadeja And Riva Solanki With Police
कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान रिवाने मास्क न घालता प्रवास केल्यामुळे आणि एका महिला पोलिस हवालदारशी बाचाबाची केल्यामुळे हा वाद पेटला. पण, अखेर त्या भागातील पोलिस उपनिरीक्षकांनी (डीएसपी) पूर्ण प्रकरण सोडवले.
पोलिसांबरोबर वादात अडकण्याची ही जडेजा कुटुंबाची पहिली वेळ नव्हती. यापुर्वीही जडेजा कुटुंब आणि पोलिस समोरासमोर आले आहेत. २ वर्षांपुर्वी म्हणजे मे २०१८ मध्ये एका पोलिसाने जडेजाची पत्नी रीवाला सर्वांसमोर चापट मारली होती. झाले असे की, रीवा तिच्या बीएमडब्ल्यू कारने कुठेतरी जात होती. त्यावेळी रिवासोबत जडेजाची आई आणि तिची मुलगी होती. दरम्यान तिची कार समोरुन येणाऱ्या पोलिस हवालदार संजय आहिर याच्या गाडीला धडकली. त्यामुळे संजय आहिरने गाडीवरुन उतरुन रिवाला मारहाण करण्यास सुरुवात केली होती.
त्यांच्यामधील भांडण वाढताना दिसल्यामुळे आसपासच्या लोकांनी त्यांच्या भांडणात हस्तक्षेप केला आणि रिवाला पोलिस उपनिरिक्षक प्रदिप सेजल यांच्याकडे पाठवले. प्रदिप सेजल यांनी नंतर पूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि आरोपी पोलिस हवालदार संजय आहिर याला अटक करण्यात आले होते.
एवढेच नव्हे तर, जडेजाच्या लग्नाच्या दिवशीही वरातीदरम्यान रिवाचे काका हरिसिंग सोलंकी (कॉंग्रेस नेता) यांच्यामुळे वाद झाले होते. १७ एप्रिल २०१६ रोजी रिवा आणि जडेजाचे लग्न झाले. त्यावेळी वरातीमध्ये रिवाच्या काकांनी बंदुकीतील तब्बल ६ गोळ्या हवेत मारल्या होत्या. म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. परंतु, ठोस पुरावे सापडले नसल्यामुळे त्यांना लवकरच कारागृहातून सोडण्यात आले.
जडेजा हा भारतीय संघातील दमदार अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्याने आतापर्यंत भारताकडून ४९ कसोटी सामने खेळत १८६९ धावा आणि २१३ विकेट्स घेतल्या आहेत. तर, टी२० क्रिकेटमध्ये ४९ सामन्यात १७३ धावा आणि ३९ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. जडेजाची वनडे क्रिकेटमधील आकडेवारीही उल्लेखनीय आहे. त्याने आतापर्यंत वनडेत १६५ सामने खेळत २२९६ धावा आणि १८७ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! यावर्षी नाही होणार आयपीएल लिलाव, ही आहेत कारणे
मुलगा स्टुअर्ट ब्रॉडने केली मोठी चूक, वडील ख्रिस ब्रॉडने सुनावली ‘बाप’ शिक्षा
बिली बाऊडेनने आपल्या खास शैलीत बोट उंचावले…आणि वॉर्नचं नाव क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीलं गेलं
ट्रेंडिंग लेख –
कसोटी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी करणारे ५ फलंदाज; एबी डिव्हिलियर्सचाही आहे समावेश
आयपीएलमधील धुव्वांदार फलंदाज व त्यांची आवडती मैदान जिथं ते गोलंदाजांना देत नाहीत सुट्टी
आयपीएलमधील ५ धाकड फलंदाज, ज्यांनी एक नव्हे तर २ वेगवेगळ्या संघांकडून ठोकली आहेत शतकं