मुंबई । पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि हरियाणाची सामिया आरजू ही क्रिकेट जगतातील प्रसिद्ध जोडीपैकी एक आहे. गतवर्ष दोघे वैवाहिक बंधनात अडकले होते. यंदाची ही त्यांची पहिली ईद होती. ईद साजरी करत असतानाचा एक फोटो या जोडप्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटोमध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहेत तरीही फॅन्स त्यांना ट्रोल करताहेत.
या जोडप्याने ईदच्या शुभेच्छा देत घरीच राहण्याचा संदेश दिला आहे. या जोडप्याच्या कपड्यांवरून नेटिझन्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सामियाने ईदच्या दिवशी घागरा घातला होता. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती, तरीही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले. एका फॅन्सने चक्क RIP फॅशन अशी प्रतिक्रिया दिली तर दुसऱ्या फॅन्सने डोक्यावरील केसांच्या कलरला देखील ट्रोल केले आहे.
https://www.instagram.com/p/CAklEYGHxXF/
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात दुबई येथे अॅटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये सामिया आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली यांचे लग्न झाले. मुळची हरियाणातल्या नूहं गावची रहिवासी असलेली सामिया गेल्या तीन वर्षांपासून दुबईमध्ये हवाईसुंदरी म्हणून कार्यरत आहे. हसन आणि सामिया यांची पहिली भेट दुबई येथे झाली होती. त्यांच्या मैत्रीचे नाते पुढे लग्नात रुपांतर झाले.