---Advertisement---

पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं

---Advertisement---

नवी दिल्ली। वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने केलेल्या उत्कृष्ट खेळीने त्रिनिबॅगो नाइट रायडर्सला बार्बाडोस ट्रायडर्सविरूद्ध झालेल्या सीपीएल २०२० च्या सामन्यात पराभवाच्या जबड्यातून एक विजय मिळविण्यास मदत केली.

यानंतर इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड गॉवरने पोलार्डला टी -२० च्या उत्तम खेळाडू पैकी एक असल्याचे म्हटले आहे , परंतु ते म्हणाले की तो कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही.

कायरन पोलार्डबद्दल व्यक्त केल मत

“कायरन पोलार्ड हा जगातील सर्वोत्तम टी-२० खेळाडूंपैकी एक आहे, पण त्याला आणि मला देखील माहित आहे की तो कसोटी क्रिकेट खेळू शकत नाही, कसोटी क्रिकेट खेळण्यास तो तितका उत्तम नाही,” स्पोर्ट्स टायगरच्या शो ‘ऑफ-द-फील्ड’ वर बोलताना गॉवर म्हणाले.

पोलार्ड मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि जगभरातील टी -२० लीगमध्ये फ्रँचायझीसाठी सर्वाधिक महत्त्वाचा क्रिकेटपटू आहे, पण त्याने कसोटी क्रिकेट कधीही खेळले नाही.

पोलार्डने मात्र ५०८ टी -२० सामने खेळले आहेत आणि सीपीएलची समाप्ती झाल्यानंतर युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडू खेळण्यासाठीही तो दाखल होणार आहे.

यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलविषयी बोलताना गोवर म्हणाले, ‘मला वाटते की एकूणच आयपीएल देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी खूप चांगले आहे. एकदिवसीय क्रिकेटचा शोध लागल्यापासूनच क्षेत्ररक्षण अविश्वसनीय झाले आहे. मला वाटते की आयपीएलच्या पहिल्या दिवसांपासून बरेच बदल झाले आहेत.’

कसोटीचा महत्त्वपूर्ण प्रचारक म्हणून गोवर यांनी कोहलीचे वर्णन केले –

इंग्लंडकडून ११७ कसोटी सामने आणि ११४ एकदिवसीय सामने खेळणारे गोवर विराट कोहली आणि त्याच्या कसोटी क्रिकेटवरील प्रेमापोटी प्रभावित झालेले दिसत होते. गोवर म्हणाले,विराट कोहली जगातील आघाडीचा खेळाडू म्हणून कसोटी क्रिकेटला सर्वात अवघड आणि महत्त्वाचे स्वरूप मानतो.

कर्णधार म्हणून कोहलीची निवड केली

सध्याच्या खेळाडूंमध्ये गोवरने आपली सर्वोत्तम कसोटी इलेव्हनचीही निवड केली आणि ते म्हणाले की, “बेन स्टोक्स आणि विराट कोहलीची त्वरित निवड होईल आणि याबद्दल काही दुमत नाही.” तसेच जो-रूट, केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ यांनाही संघाचा भाग म्हणून निवडले.

“जर सध्याचा फिरकीपटू निवडायचा असेल तर तो रविचंद्रन अश्विन किंवा नॅथन लिऑन या दोघांमधून असेल.”

ते म्हणाले, “जर मला संघासाठी कर्णधार निवडायचा असेल तर तो निश्चितच विराट कोहली असेल. विराट हा संघातील असाधारण माणूस आहे”.

महत्त्वाच्या बातम्या-

रिकी पॉन्टिंगने ‘या’ दोन भारतीय क्रिकेटपटूंचे केले तोंडभरुन कौतुक; म्हणाला…

आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे

आयसीसी टी-२० क्रमवारी: डेव्हिड मलान पहिल्या ५ मध्ये परतला, हाफिजलाही झाला फायदा

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार

-आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!

-आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---