अबु धाबीच्या मैदानावर सोमवारी (२ नोव्हेंबर) आयपीएलच्या १३ व्या हंगामातील रंगतदार लढत झाली. या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ६ विकेट्सने मात दिली. यासह दिल्लीच्या खात्यात १६ गुणांची नोंद झाली असून गुणतक्यात त्यांनी दूसरे स्थान पटकावले आहे. सोबतच एक अनोखा विक्रम दिल्ली संघाच्या नावावर झाला आहे.
जगप्रसिद्ध आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स हा एकमेव असा संघ ठरला आहे, ज्यांनी गुणतक्यातील प्रत्येक स्थान पटकावले आहे. आयपीएल २००९ आणि १२मध्ये त्यांनी अव्वल स्थानावर ताबा मिळवला होता. २०१९मध्ये तिसरे, २००८मध्ये चौथे, २०१०मध्ये पाचवे, २०१६ व १७मध्ये सहावे, २०१५मध्ये सातवे, २०१४ व १८मध्ये आठवे, २०१३मध्ये नववे आणि २०११मध्ये दहावे अशा गुणतक्यातील प्रत्येक स्थानावर हा संघ एक किंवा दोन वेळा विराजमान झाला आहे.
दिल्ली कॅपिटल्स किंवा दिल्ली डेअरडेविल्सचे गुणतक्यातील स्थान
पहिले- २००९, २०१२
दूसरे- २०२०
तिसरे-२०१९
चौथे-२००८
पाचवे-२०१०
सहावे-२०१६, २०१७
सातवे-२०१५
आठवे- २०१४, २०१८
नववे- २०१३
दहावे- २०११
महत्त्वाच्या बातम्या-
ठरलं तर! ‘या’ दोन संघात होणार आयपीएलचा क्वालिफायर सामना; पाहा काय सांगतोय क्वालिफायरचा इतिहास
पाहा कोणते ३ संघ ठरले आयपीएल प्ले ऑफसाठी पात्र? कोणत्या २ संघांना आहे संधी?
मुंबईचा ‘हा’ हुकमी एक्का लवकरच टीम इंडियात, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?