सीपीएल २०२० च्या दुसऱ्या सामन्यांत २०१९ चा विजेता बार्बाडोस ट्रायडेंट्स समोर उभा ठाकला होता तो सेंट किट्स आणि नेव्हीस पॅट्रीयॉट्सचा संघ.प्रथम फलंदाजी करणाऱ्या बार्बाडोसच्या ३ बाद ८ अशा खराब सुरुवातीनंतरही जेसन होल्डर (३८) व मेयर्स (३७) ने डाव सावरला. यांच्यासोबतच सॅंटनर (२०) व राशिद खान (नाबाद २६) संघाला १५३ धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भुमिका निभावली होती.
१५४ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या सेंट किट्सचा ५ व्या षटकांत ख्रिस लीन (१९) माघारी परतला होता. त्यानंतर ६ व्या षटकांत गोलंदाजीस आलेल्या राशिद खानच्या गोलंदाजी करताना युवा फलंदाज एव्हिन लुईसला शानदार धावबाद करत संघाला आणखी एक विकेट मिळवून दिली.
झाले असे की जोशुआ दा सिल्वाने राशिदच्या गोलंदाजीवर चेंडू नॉन स्ट्रायकरच्या यष्टीवर मारला होता, त्यात फक्त एकच यष्टि व एक बेल्स पडली होती. त्याच वेळेस नॉन स्ट्रायकरला असलेल्या एव्हिन लुईसने क्रिज सोडले होते आणि राशिद खानने क्षणाचाही विलंब न करता चेंडूने उभ्या असलेल्या यष्टि उडवत सेंट किट्सचा महत्त्वाचा फलंदाज एव्हिन लुईसला धावबाद करत माघारी धाडले होते.
Quick hands by @rashidkhan_19 produces a spectacular run out and is our Googly Magic Moment from match 2. #CPL20 #BTvSKP #CricketPlayedLouder pic.twitter.com/xLrF4Fm1PN
— CPL T20 (@CPL) August 19, 2020
जोशुआ दि सिल्वा (नाबाद ४१) व बेन डंक (३४) ने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण सेंट किट्सचा संघ विजयापासुन ६ धावा दुर राहिला. २०१९ विजेता बार्बाडोसने नव्या सत्राची सुरुवात विजयाने केली.बदली खेळाडु म्हणून आलेल्या मिशेल सॅंटनरने अष्टपैलु प्रदर्शन करत सामनावीर पुरस्कार पटकावला.