युएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील साखळी फेरीतील शेवटचा सामना मंगळवारी (3 नोव्हेंबर) झाला. सनरायझर्स हैदराबादसाठी ‘करो वा मरो’च्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 10 विकेट्सने दारुण पराभव झाला. या विजयासह हैदराबाद प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा चौथा संघ ठरला. त्यामुळे आता प्ले ऑफमधील सामन्यांचे समीकरण निश्चित झाले आहे.
प्ले ऑफमधील चार संघ
चार वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स सर्वाधिक 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघही 16 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. याखेरीज सनरायझर्स हैदराबादने मुंबईला नमवून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळे बेंगलोर संघ १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
…असे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच घडले
आयपीएलच्या इतिहासात प्रथमच तळातील संघाचे 12 गुण आहेत. इतकेच नाही, तर गुणतालिकेत तीन संघांचे 14 व इतर तीन संघांचे 12 गुण आहेत. आता अव्वल 4 संघ निश्चित झाले आहेत, त्यामुळे प्लेऑफच्या पहिल्या टप्प्याचे समीकरणही तयार आहे.
मुंबई-दिल्ली यांच्यात होईल पहिला क्वालिफायर
पहिला क्वालिफायर गुरुवारी (5 नोव्हेंबर) अव्वल दोन संघांमध्ये म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये खेळला जाईल.
हैदराबाद-बेंगलोर यांच्यात होईल एलिमिनेटर सामना
दुसर्या दिवशी शुक्रवारी (6 नोव्हेंबर) होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात तिसरा आणि चौथ्या क्रमांकावरील संघ म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने सामने येतील.
A look at the Road To The Final for #Dream11IPL 2020 pic.twitter.com/Zrz7Su7qa4
— IndianPremierLeague (@IPL) November 3, 2020
क्वालिफायर 1 मधील विजयी संघ खेळेल अंतिम सामना
मुंबई व दिल्ली यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम सामना खेळेल. बेंगलोर आणि हैदराबाद यांच्यात होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर 1 मधील पराभूत होणाऱ्या संघाचा सामना क्वालिफायर 2 मध्ये करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-IPL 2020 : हैदराबादविरुद्ध पराभूत होऊनही मुंबईचा ‘खास’ पराक्रम; घातली दुसऱ्या क्रमांकाला गवसणी
-मुंबईचे प्रयोग फसले! हैदराबादविरुद्धच्या दारुण पराभवानंतर रोहितची निराशाजनक प्रतिक्रिया, म्हणाला…
-मुंबईला पराभवाची धूळ चारत हैदराबाद प्लेऑफमध्ये दाखल, वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतके
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?