इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील शेवटचा साखळी सामना मंगळवारी (3 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. हैदराबादसाठी ‘करो अथवा मरो’च्या या सामन्यात मुंबईचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा निराश होता. सामन्यानंतर बोलताना त्याने संघ पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला.
हैदराबादने मिळवला विजय
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादने 10 गडी राखून अवघ्या 17.1 षटकांत हे लक्ष्य गाठले.
प्रयोग यशस्वी झाले नाहीत- रोहित शर्मा
सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “आम्हाला हा दिवस आठवायला आवडणार नाही. या हंगामातील ही सर्वात वाईट कामगिरी होती. आम्ही काही प्रयोग केले जे यशस्वी ठरले नाहीत. आमच्या संघातील वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले.”
हॅमस्ट्रिंगचा त्रास पूर्णपणे झाला बरा
रोहित शर्माला काही दिवसांपूर्वी हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलच्या काही सामन्यांना मुकला होता. मात्र, हैदराबादविरुद्ध त्याने पुनरागमन केले. पुनरागमनाबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, “मला मैदानात परत येऊन चांगलं वाटलं. काही सामने पुन्हा खेळायचे आहेत. हॅमस्ट्रिंगचा त्रास आता पूर्णपणे बरा झालेला आहे.”
अधिक धावा करण्यात मुंबई अपयशी
मैदानात सहसा दव पडतात. याविषयी बोलताना तो म्हणाला की, “मैदानात दव आहे की नाही हे पाहण्याचे दोन मार्ग आहेत. वानखेडे स्टेडियमवर नेहमीच दव पडते, त्यामुळे नाणेफेक गमावल्यामुळे आपण निराश होऊ इच्छित नाही. आम्ही अधिक धावा केल्या नाहीत त्यामुळे आमच्यावर दबाव आला. आम्ही पॉवरप्लेमध्ये गडीही गमावले.”
कामगिरीत सतत सुधारणा करायला हवी- रोहित
“आयपीएल एक मजेदार प्रकार आहे ज्यात सातत्याने चांगली कामगिरी करावी लागते. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मिळवलेले दोन विजय अविस्मरणीय होते. पण आपण वर्तमान काळात जगायला हवे आणि कामगिरीत सतत सुधारणा करायला हवी,” असेही पुढे बोलताना रोहित म्हणाला.
मुंबईचा प्ले ऑफमधील पहिला सामना गुरुवारी (5 नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. या सामन्यात मुंबई कशी कामगिरी करेल हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-IPL 2020 : हैदराबादविरुद्ध पराभूत होऊनही मुंबईचा ‘खास’ पराक्रम; घातली दुसऱ्या क्रमांकाला गवसणी
-SRH VS MI: चुरसीच्या सामन्यात वॉर्नरची मोठ्या विक्रमाला गवसणी, लागोपाठ सहाव्यांदा केला पराक्रम
-मुंबईला पराभवाची धूळ चारत हैदराबाद प्लेऑफमध्ये दाखल, वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतके
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?