आयपीएल म्हटले की सर्वांना पहिल्यांदा आठवते ती गोष्ट म्हणजे चौकार, षटकारांची आतिषबाजी. आयपीएलमध्ये नेहमीच फलंदाज वेगवेगळे विक्रम करत असतात. पण यामध्ये असाही एक नकोसा विक्रम आहे जो हरभजन सिंगच्या नावावर आहे.
आयपीएलच्या इतिहासात आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा शून्य धावेवर बाद होण्याच्या यादीत हरभजन सिंग अव्वल क्रमांकावर आहे. तो आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 160 सामन्यात खेळला असून यात तो 13 वेळा शून्य धावेवर बाद झाला आहे.
पण याबरोबरच त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 829 धावाही केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. हरभजन 2017 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळला. त्यानंतर 2018 पासून तो चेन्नई सुपर किंग्जने त्याला संघात घेतले.
हरभजन पाठोपाठ आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा बाद होण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पार्थिव पटेल आहे. पार्थिव 113 सामन्यात १३च वेळा शुन्यावर बाद झाला आहे.
तसेच तिसऱ्या क्रमांकावर पियूष चावला, मनिष पांडे, अंबाती रायडू, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा असे पाच खेळाडू आहेत. हे पाचही खेळाडू आयपीएलमध्ये आत्तापर्यंत प्रत्येकी 12 वेळा शून्य धावेवर बाद झाले आहेत.
अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये प्रत्येकी 11 वेळा भोपळाही न फोडता बाद झाले आहेत.