मुंबई । भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या नुकताच वडील झाला आहे. त्याची मैत्रीण नताशा स्टॅन्कोविच हिने एका गोंडस बाळास जन्म दिला आहे. हार्दिक आणि नताशाने या छोट्या मुलाचे नामकरण देखील केले आहे.
हार्दिक पंड्याने इन्स्टाग्रामच्या स्टोरी ठेवली असून त्यात त्याने त्याच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे.
खरं तर, मर्सिडीज एएमजी या लक्झरी कार कंपनीने हार्दिक पंड्याच्या मुलासाठी या कारचे टॉय मॉडेल पाठविले आहे.
यानंतर, हार्दिकने या भेटवस्तूबद्दल कंपनीचे आभार मानले आणि सांगितले की, “अगस्त्याच्या पहिल्या एएमजीसाठी एमएमजी बंगळुरूचे आभार”
या खेळण्याबरोबर पंड्याने स्वत: चा एक फोटोदेखील शेअर केला आहे, यात तो टॉय कारवर बसलेला दिसत आहे. मात्र, त्याच्या पोस्टवरून हे स्पष्ट झाले की, त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य आहे.
Hardik Pandya revealed his son's name as Agastya in his recent instagram story#HardikPandya pic.twitter.com/AuDoe57MOr
— Tech Cred (@TechCredRewards) August 18, 2020
सध्या पंड्या आपल्या परिवारासोबत वेळ घालवत असून लवकरच तो यूएईकडे रवाना होणार आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-अनिल कुंबळेकडून गुरुमंत्र घेऊन केएल राहुलने सुरू केली आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची तयारी
-सगळे प्रयत्न करुन झाले! पहा अखेर शोएब- सानिया भेटले की नाही?
-इतिहास घडला! इंग्लंडच्या ‘या’ फलंदाजाने दहाव्या क्रमांकावर खेळताना ठोकले तुफानी शतक
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकवणारे ३ भारतीय क्रिकेटपटू
-आयपीएल २०२०: आरसीबीसाठी असे असू शकतात सलामी जोडीचे ३ पर्याय