आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपची सुरुवात १ ऑगस्ट २०१९ ला ऍशेज सीरीजसोबत झाली आहे. जून २०२१ पर्यंत चालणाऱ्या या चॅम्पियनशीपमध्ये एकूण ९ संघ सहभागी होणार आहेत. शेवटी टॉप-२ संघांमध्ये इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्यात येईल.
कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना २ वर्षांत ६ कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहेत. प्रत्येक सीरीजमध्ये विजयी संघाला १२० गुण मिळतील. झिम्बाब्वे, अफघानिस्तान आणि आयर्लंड या संघांना आयसीसीकडून कसोटी दर्जा प्राप्त झाला आहे. पण हे तिन्ही संघ आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपचा भाग नाहीत.
आतापर्यंत आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपमध्ये बांग्लादेश हा एकमेव असा संघ आहे, ज्याने एकही सामना जिंकला नाही. तर, भारताने आतापर्यंत ४, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडने ३-३, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकाने प्रत्येकी २-२ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. इंग्लंड आणि पाकिस्तान संघ आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपमधील आपली चौथी कसोटी मालिका खेळत आहेत.
या लेखात, आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपमधील आतापर्यंतच्या संघांची गुणपत्रिका देण्यात आली आहे (ICC Test Championship 2019-2021 Point Table)-
१. भारत: सामने- ९, विजय- ७, पराभव- २, गुण- ३६०
२. ऑस्ट्रेलिया: सामने- १०, विजय- ७, पराभव- २, गुण- २९६
३. इंग्लंड: सामने- १४, विजय- ८, पराभव- ४, गुण- २७९
४. न्यूझीलंड: सामने- ७, विजय- ३, पराभव- ४, गुण- १८०
५. पाकिस्तान: सामने- ७, विजय- २, पराभव- ३, गुण- १५३
६. श्रीलंका: सामने- ४, विजय- १, पराभव- २, गुण- ८०
७. वेस्ट इंडिज: सामने- ५, विजय- १, पराभव- ४, गुण- ४०
८. दक्षिण आफ्रिका: सामने- ७, विजय- १, पराभव- ६, गुण- २४
९. बांग्लादेश: सामने- ३, विजय- ०, पराभव- ३, गुण- ०