कोरोना या साथीच्या आजारामुळे मिळालेल्या दीर्घकाळ विश्रांतीनंतर भारतीय संघ पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २७ नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेसाठी खेळाडू कठोर परिश्रम करत आहेत. ते नेटमध्ये कसून सराव करत आहेत. अशातच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या मालिकेसाठी केलेल्या तयारीबद्दल मत व्यक्त केले आहे.
स्वतःशीच सामना करण्यासाठी तयार..
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेबद्दल बोलताना बुमराह म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. दोन्ही संघांमध्ये बरोबरीची टक्कर पाहायला मिळते. सर्वोत्तम संघाविरुद्ध आपण नेहमी उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच अशा परिस्थितीत मी स्वतःशीच सामना करण्यासाठी तयार राहतो, जेणेकरून दबावात मी माझा खेळ आणखी सुधारू शकेन.”
आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्यात बुमराह दुसऱ्या स्थानी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी बुमराहची तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. यावर्षी आयपीएलमध्ये त्याने शानदार गोलंदाजी केली होती. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी होता. त्याने आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना १५ सामन्यात २७ विकेट्स घेतल्या होत्या.
सिडनी येथे होईल पहिला वनडे सामना
ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारतीय संघ ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर या दोन्ही संघात ४ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. २७ नोव्हेंबरला सिडनी येथे पहिला वनडे सामना होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
मुलाच्या जन्मानंतर विराट पुन्हा परतणार ऑस्ट्रेलियात? मुख्य प्रशिक्षकाचे मोठे विधान
अनोख्या पद्धतीने साजरा केला सैनीचा वाढदिवस, खेळाडू दिसले मास्कमध्ये
‘संघ सहकाऱ्यांनी धीर दिला’, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत सिराज झाला भावुक