---Advertisement---

तब्बल ५ महिन्यांनतर मैदानात उतरल्याबद्दल कॅप्टन कोहली म्हणतो, असे वाटते की…

On: रविवार, ऑगस्ट 30, 2020 4:17 PM
---Advertisement---

मुंबई । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटपटू बर्‍याच दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरले असून त्यांनी आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली आहे. पाच महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली, मर्यादित षटकांचे उपकर्णधार रोहित शर्मा व अन्य काही खेळाडू नेट प्रॅक्टिसमध्ये प्रथमच दाखल झाले.

कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स याशिवाय राजस्थान रॉयल्सने अबूधाबी येथे पहिल्या नेट सेशनमध्ये भाग घेतला. दिल्ली कॅपिटल्स संघाने नुकतेच क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे ते देखील लवकरच मैदानात परततील.

आरसीबी, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सनंतर 23 ऑगस्ट रोजी दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबादचे भारतीय खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी युएईमध्ये दाखल झाले होते.

त्यानंतर संघ सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर प्रथमच त्यांच्या सराव सत्रासाठी एकत्र येत आहेत. बऱ्याच विश्रांतीनंतरही कोहली नेट प्रॅक्टिसमध्ये सहज दिसला. या प्रॅक्टिस सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि आरसीबी संघाचे संचालक माइक हेसनसुद्धा होते. हेसन, कोहली आणि स्टेनशी बोलतानाही दिसला आहे.

कोहलीने ट्विट केले की, “मी पाच महिन्यांनंतर मैदानावर पाऊल ठेवत आहे. पण नेटमध्ये गेलो तेव्हा असे वाटत आहे की सहा दिवसच झाले आहेत. संघातील खेळाडूंसह हा पहिला चांगला दिवस होता.’

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ अबु धाबीच्या मैदानावर सराव करत होता. रोहितने बुमराहच्या गोलंदाजीवर फलंदाजीचा सरावही केला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चेंडू अधिक वेगाने टाकत लय मिळविण्याचा प्रयत्न केला. राजस्थान रॉयल्सने दुबईच्या आयसीसी अ‍ॅकॅडमीमध्ये नेट सेशनमध्ये भाग घेतला.

बीसीसीआयने जारी केलेल्या मानक संचालन प्रक्रियेअंतर्गत, सर्व खेळाडू आणि सहयोगी सदस्यांनी युएईमध्ये आल्यानंतर सहा दिवसांचे क्वारंटाइन पूर्ण केले. सर्वांची कोरोना चाचणी पहिल्या, तिसर्‍या आणि सहाव्या दिवशी करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या – 

वेगवान गोलंदाज दीपक चहराला कोरोनाची लागण? बहिण मालतीने दिली अशी प्रतिक्रिया

राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकांनी केली कोरोनावर मात; दुबईमध्ये झाले दाखल

भारतीय दिग्गजाने निवडले आरसीबी संघातील ४ परदेशी खेळाडू, म्हणतोय या हंगामात…

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता

मुंबई इंडियन्सचे आयपीएल इतिहासातील ३ चित्तथरारक सामने

आख्ख्या पिढीला वेड्यात काढलेल्या क्रिकेटमधील काही मजेशीर अफवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---