इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १३ व्या हंगामात फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून चमकदार कामगिरी केल्यामुळे मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्तीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टी२० संघात निवड झाली. यानंतर वरुणने आपले मत व्यक्त करत म्हटले की, हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.
कर्नाटकमध्ये जन्मलेल्या २९ वर्षीय वरुणने २०१८ नंतर आपल्या फिरकी गोलंदाजीवर लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याने म्हटले की, राष्ट्रीय संघात निवड होण्याची अपेक्षा नव्हती. त्याने केवळ १२ देशांतर्गत टी२० सामने खेळले आहेत, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केवळ एकच सामना खेळला आहे.
सोमवारी (२६ ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना झाल्यानंतर बीसीसीआय टीव्हीशी बोलताना वरुण म्हणाला की, “सामन्यानंतर मला भारतीय संघात निवड झाल्याचे समजले. मी सतत असेच म्हणेल की, ही सुखद भावना आहे.”
“माझे लक्ष्य संघाकडून नियमित खेळणे, चांगली कामगिरी करणे आणि विजयात योगदान देण्यात आहे. अपेक्षा आहे की भारताकडूनही मी हे करण्यात यशस्वी ठरेल. मी सोशल मीडियावर सक्रिय नाही आणि निवडकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. खरंतर हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकेड शब्द नाहीत,” असेही पुढे बोलताना तो म्हणाला.
आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना वरुणने म्हटले, “मी २०१८ मध्ये फिरकी गोलंदाजीला सुरुवात केली होती, तेव्हा मला तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये निवडले होते. मागील वर्षात अनेक चढ-उतार आले. मला अधिक संधी मिळाल्या नाहीत. आणि मी दुखापतग्रस्तही झालो. देवाच्या कृपेने यावर्षी मी पुनरागमन करण्यात यशस्वी झालो.”
वरुणने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत.
#TeamIndia T20I squad: Virat Kohli (Capt), Shikhar, Mayank Agarwal, KL Rahul (vc & wk), Shreyas Iyer, Manish, Hardik Pandya, Sanju Samson (wk), Ravindra Jadeja, Washington Sundar, Yuzvendra Chahal, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Navdeep Saini, Deepak Chahar, Varun Chakravarthy
— BCCI (@BCCI) October 26, 2020
भारतीय टी२० संघ:
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अगरवाल, केएल राहुल (उप कर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती
-चमत्कारच! कोलकाताचा ‘हा’ मिस्ट्री खेळाडू सात प्रकारे करु शकतो गोलंदाजी
ट्रेंडिंग लख-
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
-IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी