मुंबई । इंग्लंडसाठी 2004 ते 2014 दरम्यानच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत केवीन पीटरसन हा जगातील सर्वात आक्रमक फलंदाज होता. विशेषत: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये. नुकतेच पीटरसनने त्याला त्याच्या कारकिर्दीत भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडकडून मिळालेल्या महत्त्वाच्या सल्ल्याबद्दल खुलासा केला आहे.
पीटरसन म्हणाला की, स्पिन कसे खेळायचे याबद्दल द्रविडने दिलेल्या सल्ल्यामुळे त्याच्यासाठी नवीन मार्ग खुले झाले.
तो म्हणाला की, “इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) अनुभव, द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग सारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळल्यामुळे मी विविध प्रकारचे फटके मारू लागलो.”
पीटरसन आयपीएल संघांसाठी डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याकडून खेळला आहे.
“द्रविडने मला सर्वात सुंदर ईमेल लिहिला होता, मला फिरकी खेळण्याची कला सांगितली आणि तेव्हा माझ्या समोर एक नवीन जग आले,” असे केविन पीटरसन याने नमूद केले. द्रविड आणि पीटरसन आयपीएलच्या सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून एकत्र खेळायचे.
वनडे क्रिकेटमधील फलंदाजीच्या शैलीत झालेल्या बदलांवर चर्चा करताना पीटरसनने स्काय स्पोर्ट्सवर सांगितले की, “सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फेकल्या गेलेल्या चेंडूची लांबी पाहणे, फिरकीची वाट पाहून आणि आपल्याला निर्णय घ्यावा लागतो”
पीटरसनचा ‘स्विच हिट’ हा शॉट सर्वात प्रसिद्ध होता. हा शॉट खेळण्यासाठी तरुणपणी तो सातत्याने स्क्वॉश खेळत असल्याचे पीटरसनने सांगितले.
पीटरसनने 104 कसोटी सामन्यांमध्ये 47.28 च्या सरासरीने 8181 धावा केल्या, तर 136 वनडे सामन्यात त्याने 40.73 च्या सरासरीने 4440 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…
आयपीएल गवर्निंग काउंसिलची आज बैठक, घेतले जातील ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
गांगुलीचा महिला आयपीएलच्या आयोजनासाठी हिरवा कंदील; यावेळी होऊ शकतात सामने
ट्रेंडिंग लेख –
या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल
लग्न न करताच वडील होणारे हे आहेत ४ क्रिकेटपटू
आयपीएल २०२० ठरु शकतो या ५ खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम