---Advertisement---

‘या’ देशातील खेळाडूंसाठी आहे आनंदाची बातमी, बोर्डाने पगारात केलीय ८३ टक्के वाढ

On: बुधवार, सप्टेंबर 9, 2020 5:45 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) काल (८ सप्टेंबर) सुधारित वेतन संरचना जाहीर केली आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू एका हंगामातील प्रदर्शनाने ३२ लाख पीकेआर (भारतीय रक्कम- १४ लाख) कमाऊ शकतो. यामध्ये एका महिन्याची राखीव रक्कम १.३० लाख पीकेआरचादेखील (भारतीय रक्कम- ६६ हजार) समावेश आहे. Major Increase In Pakistani Domestic Players Salary

बोर्डाने ३० सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या देशांतर्गत हंगामापुर्वी या नव्या सुधारित वेतन संरचनेची घोषणा केली आहे. दमदार देशांतर्गत क्रिकेटपटू पूर्ण हंगामात जास्तीत जास्त ३२ लाख पीकेआर कमाऊ शकतात. ही रक्कम २०१९-२० हंगामातील रक्कमेपेक्षा ८३ टक्के जास्त आहे. तर, या खेळाडूंची कमीत कमी पगार ही १८ लाख पीकेआर असेल, जी गेल्या हंगामापेक्षा ७ टक्के जास्त आहे.

ए प्लस श्रेणीमध्ये येणाऱ्या खेळाडूंना १२ महिन्यांपर्यंत १.३० लाख पीकेआर मासिक राखीव रक्कम मिळेल. तर खेळाडूंना याव्यतिरिक्त राष्ट्रीय टी२० चषक आणि पाकिस्तान चषकात खेळण्यात येणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी ४० हजार पीकेआर दिले जातील. तर, कायदे आझम ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्याचे ६० हजार पीकेआर रुपये मिळतील, अशी माहिती बोर्डाने दिली.

तर, श्रेणींनुसार खेळाडूंना मासिक राखीव रक्कम दिली जाई. पण त्यांची सामना फी ही सारखीच असेल.

ए प्लस श्रेणीतील १० खेळाडूंना १.३० लाख पीकेआर मासिक राखीव रक्कम मिळेल. ए श्रेणीतील ३८ खेळाडूंना ८५ हजार पीकेआर, बी श्रेणीतील ४८ खेळाडूंना ७५ हजार पीकेआर मिळतील. तर, सी श्रेणीतील सर्वाधिक ७२ खेळाडूंना ६५ हजार पीकेआर आणि डी श्रेणीतील २४ खेळाडूंना ४० हजार पीकेआर रक्कम मिळले.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएलमध्ये विराट-धोनीसारख्या भारतीय दिग्गजांनाच करावा लागणार अडचणींचा सामना; जाणून घ्या कारण

-मुंबईचा पोरगा घाबरतोय वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला, म्हणतोय त्याच्याविरुद्ध मला नाही करायची गोलंदाजी

-आयपीएलमध्ये २ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळालेला ‘हा’ खेळाडू विकायचा पाणीपुरी

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?

-३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध

-रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---