fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमध्ये २ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळालेला ‘हा’ खेळाडू विकायचा पाणीपुरी

Yashasvi jaiswal profile rajasthan royals

September 9, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

नवी दिल्ली। आयपीएल 2020 च्या इतिहासातील पहिले चॅम्पियन राजस्थान रॉयल्स नेहमीच युवा खेळाडूंवर बरीच रक्कम खर्च करतात. आयपीएल 2020 साठी फ्रँचायझीने 19 वर्षीय फलंदाज यशस्वी जयस्वालला 2 कोटी 40 लाख रुपयांमध्ये संघात सामील केले आहे.

प्रत्येक फ्रँचायझीला त्याला संघात सामील करून घ्यायचं होत. असे असलं तरी राजस्थान रॉयल्सला यात यश मिळालं. आयपीएलच्या लिलावात या तरुण फलंदाजाच्या नावाची खूप चर्चा होती. याचे कारण त्याच्या फलंदाजीची चमक होय.

19 वर्षांखालील विश्वचषकात यशस्वीने मैदानावर गदारोळ निर्माण केला. उत्तर प्रदेशात 28 डिसेंबर 2001 रोजी त्याचा जन्म झाला. सलामीचा फलंदाज म्हणून तो घरघुती क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा तो जगातील सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे.

2015 मध्येच त्याच्या नावाची होऊ लागली चर्चा

यशस्वीने 2015 मध्ये नाबाद 319 धावांची खेळीसोबतच 99 धावांत 13 बळी घेऊन इतिहास रचला होता. शालेय क्रिकेटमधील हा त्याचा अष्टपैलू विक्रम होता. लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद केली गेली आहे.

एकेकाळी मुंबईत क्रिकेटसाठी पाणीपुरी विकणाऱ्या या खेळाडूने नंतर मागे वळून पाहिले नाही. यावर्षी 19 वर्षाखालील विश्वचषकात संपूर्ण जगाला भारताच्या या उदयोन्मुख खेळाडूची ओळख पटली.

19 वर्षांखालील विश्वचषकात यशस्वीने सर्वाधिक धावा केल्या. यात पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यातील शतकाचा समावेश आहे.

विश्वचषकात अशी होती कामगिरी

यंदाच्या विश्वचषकात यशस्वीने श्रीलंकेविरूद्ध 59, जपानविरुद्ध नाबाद 29, न्यूझीलंडविरूद्ध नाबाद 57, ऑस्ट्रेलियाविरूद्ध 62, पाकिस्तानविरुद्ध 105 आणि बांगलादेशविरूद्ध 88 धावा केल्या.अंतिम सामन्यात भारतीय संघाचा 3 गड्यांनी पराभव झाला.

यशस्वीने 2019 मध्ये एकमेव प्रथम श्रेणी सामना खेळला होता, तेथे त्याने एकूण 20 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 13 सामन्यात 779 धावा केल्या ज्यामध्ये त्याचा सर्वोत्तम डाव 203 धावांचा होता.

महत्त्वाच्या बातम्या –

-पदार्पणाच्या वर्षातच संघाला एक नव्हे तर दोन ट्रॉफी दिल्या जिंकून, आता तोच खेळाडू बनवेल विराटच्या आरसीबीला विजेता

-या देशातील खेळाडूंना आयपीएलमधील एका तरी सामन्याला लागणार मुकावे; जाणून घ्या कारण

-शाहरूख खानच्या नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा ट्रॉफी पटकावण्याची संधी, तर… 

ट्रेंडिंग लेख –

-आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?

-३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध

-रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे


Previous Post

आयपीएलमध्ये झळकावणार शतक, पहा कोण आहेत ते ३ युवा भारतीय फलंदाज

Next Post

मुंबईचा पोरगा घाबरतोय वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला, म्हणतोय त्याच्याविरुद्ध मला नाही करायची गोलंदाजी

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
IPL

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

मुंबईचा पोरगा घाबरतोय वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला, म्हणतोय त्याच्याविरुद्ध मला नाही करायची गोलंदाजी

आयपीएलमध्ये विराट-धोनीसारख्या भारतीय दिग्गजांनाच करावा लागणार अडचणींचा सामना; जाणून घ्या कारण

विराटशी तुलना करणे सोडा, मी तर त्याच्या आसपासही नाही...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.