नवी दिल्ली | किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मनदीप सिंगच्या दमदार कामगिरीमुळे पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर 8 गडी राखून विजय मिळविला. मनदीप सिंगने 55 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या होत्या. हा डाव या फलंदाजासाठी खूपच खास आणि संस्मरणीय होता, कारण त्याने वडिलांच्या निधनानंतर काही दिवसानंतर हा अतीशी डाव खेळला. अर्धशतक झळकावून त्याने आकाशाकडे पाहिले आणि हा डाव वडिलांना समर्पित केला. बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीनेही त्याचे कौतुक केले आहे.
दु:खाच्या वेळी संघाची साथ न सोडल्याबद्दल आणि संपूर्ण धैर्याने खेळल्याबद्दल चाहते त्याला सलाम करत आहेत. आता विराट कोहलीनेही त्याला सलाम केला आहे.
कोहलीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर मनदीपच्या फोटोसह एक हृदयस्पर्शी संदेश लिहिला आहे. त्याने लिहिले आहे की, “ मनदीप एक आनंदी क्रिकेटपटू आहे ज्याला मी बऱ्याच दिवसांपासून ओळखतो. तुझ्याकडे जीवनाबद्दल विश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन आहे. म्हणूनच तू कठीण दिवसातही मैदानावर चांगली कामगिरी केली. खूप चांगला खेळला शेरा. वडील तुला आशीर्वाद देत असतील.”
शुक्रवारी (23 ऑक्टोबर) मनदीपच्या वडिलांचे निधन झाले होते. दुसर्याच दिवशी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना खेळण्यासाठी ते मैदानात उतरला होता. त्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर त्याने केकेआरविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली.
https://twitter.com/Amanb1971/status/1321072113466310657
सामन्यानंतर वडिलांची आठवण काढत मनदीप म्हणाला होता की, “बाबा नेहमी नाबाद खेळी खेळायला सांगायचे.”
मनदीपची कारकीर्द
मनदीपने भारतीय संघाकडून 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 43.5 च्या सरासरीने 87 धावा केल्या आहेत. 52 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
आयपीएलमध्ये त्याने 102 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 22.53 च्या सरासरीने 1645 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 77 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएलच्या मैदानावरच मिळाली काळीज तोडणारी बातमी, ‘या’ खेळाडूच्या वडिलांचे निधन
-IPL2020 : सामन्याअगोदर वडिलांचे निधन, डोंगराएवढे दुःख पचवून ‘तो’ उतरला सलामीला
-वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत त्याने केली दमदार खेळी, म्हणाला “बाबा नेहमीच मला…”
ट्रेंडिंग लेख-
-…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे
-अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…