---Advertisement---

‘कपिल-धोनी नव्हे तर सौरव गांगुली भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार,’ जाणून घ्या का असे म्हणाला हा भारतीय क्रिकेटर

On: रविवार, ऑगस्ट 9, 2020 9:34 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला एकापेक्षा एक दमदार कर्णधार लाभले आहेत. एकीकडे भारताला विश्वविजेते बनवणारे कर्णधार कपिल देव आणि एमएस धोनी आहेत. तर दूसरीकडे आपल्या दमदार नेतृत्त्वाने संघाला कित्येक आंतरराष्ट्रीय सामने जिंकून देणारे सौरव गांगुली, विराट कोहली आणि मोहम्मद अझरुद्दीन हे कर्णधार आहेत. या सर्व कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली खेळलेले अनेक भारतीय दिग्गज आणि युवा खेळाडू त्यांच्या मते कोणता कर्णधार सर्वश्रेष्ठ आहे, हे सांगतात. तर, कधी याच कर्णधारांची एकमेकांशी किंवा इतर संघातील दमदार कर्णधारांची तुलना केली जाते.

आता भारताचे माजी फिरकीपटू मनिंदर सिंग यांनी सर्वश्रेष्ठ भारतीय कर्णधाराविषयी त्यांचे मत मांडले आहे. मनिंदर यांच्या मते, “भारताचा यशस्वी कर्णधार सौरव गांगुली हा भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे. कोणत्याही कर्णधाराची श्रेष्ठता ही त्याने संघाला किती सामने किंवा टूर्नामेंट जिंकून दिले आहेत, यावरुन करता येत नाही. तर, कोणत्याही कर्णधाराचे सर्वात महत्त्वाचे काम हे असते की, त्याने आपल्या संघात एक विश्वास निर्माण करावा आणि खेळाडूंचे पूर्णपणे समर्थन करावे.” Maninder Singh Says That Sourav Ganguly Is The Best Captain Of Indian Team

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत मनिंदर यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “नेतृत्त्वामध्ये कपिल देव आणि एमएस धोनी सारखे आहेत. जेव्हा कपिल संघाचा कर्णधार होता, तेव्हा संघामध्ये तो विश्वास नव्हता. सकारत्मकता, शांती आणि रणनिती आखण्याबाबत दोघेही सारखे होते. माझ्यासाठी कपिल आणि धोनी बरोबरीवर आहेत. जर, कपिलपुर्वी दूसऱ्या कोणत्या कर्णधाराने विश्वचषक जिंकला असता, तर कपिल अजून जास्त चांगला कर्णधार बनू शकला असता.”

मनिंदर यांनी गांगुलीची प्रशंसा करताना म्हटले की, “गांगुलीने भारतीय संघात एक प्रकारची धारणा निर्माण केली. त्यामुळे संघ कोणत्याही परिस्थितीत सामने जिंकू शकत होता. त्याने संघाला अनेक शानदार खेळाडू दिले. धोनी नशीबवान होता की, त्याच्यापुर्वी कपिलने १९८३मध्ये भारताला विश्वचषक जिंकून दिला होता आणि धोनीपुर्वी गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होता. त्यामुळे धोनीला सर्वात मोठा फायदा झाला.”

कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली खेळलेले मनिंदर म्हणले की, “मला गांगुलीची नेतृत्त्व करण्याची पद्धती आवडत होती. तो टॅलेंटची पारख करण्यात खूप चांगला होता. त्याने युवराज सिंगला घडवले आणि संघातून बाहेर काढलेल्या हरभजन सिंगला पुन्हा संघात सामाविष्ट केले. माझ्या मते, गांगुलीने झहीर खानला काउंटी क्रिकेट खेळायला सांगितले होते आणि त्यानंतर आम्हाला वेगळाच झहीर पाहायला मिळाला. माझ्यासाठी गांगुली हाच सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे.”

मनिंदर यांनी १९८२ ते १९९३ दरम्यान भारताकडून ३५ कसोटी सामने खेळले. दरम्यान त्यांनी ८८ विकेट्स घेतल्या होत्या. तर, ५९ वनडे सामने खेळत त्यांनी ६६ विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

रिषभ पंतने ‘या’ दिग्गजाचा ऑटोग्राफ घेतलेला फोटो केला शेअर, सोबत लिहिला भावनिक मेसेज

या दिग्गजाचा गजब खुलासा, ‘दुखापतीमुळे केला होता ३८० धावांचा विश्वविक्रम’

संघसहकाऱ्याच्या ‘त्या’ कृत्यामुळे संपले ‘या’ दिग्गज खेळाडूचे करिअर; कसोटीच्या एका डावात घेतल्या होत्या ९ विकेट्स

ट्रेंडिंग लेख –

वयाची चाळीशी ओलांडली तरी कसोटी क्रिकेट खेळणारे ४ भारतीय दिग्गज

एकाच वनडेत ५० पेक्षा अधिक धावा करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ४ भारतीय क्रिकेटर

हे ५ दिग्गज कदाचित कधीच नाही खेळू शकणार आयपीएल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---