कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदाचा दिनेश कार्तिकने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ओएन मॉर्गन कोलकाताचा नवीन कर्णधार असेल. त्याने फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. याबद्दल शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) कोलकाता संघाने माहिती दिली आहे. पण दिनेशची नेतृत्त्वपद सोडण्याची भविष्यवाणी फार पुर्वी झाली होती.
माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने या गोष्टीची संभावना व्यक्त केली होती. तिवारी यावर्षी आयपीएलच्या कोणत्याही संघाचा भाग नाही. पण तो क्रिकेट तज्ञ म्हणून क्रिकबज या वेबसाइटद्वारे आयपीएलशी जोडला गेला आहे.
४ ऑक्टोबर रोजी याविषयी बोलताना तिवारी म्हणाला होता की, “दिनेशला कोलकाता संघाच्या नेतृत्त्वपदावरुन काढून टाकले जाऊ शकते आणि त्याच्याऐवजी मॉर्गनवर ही जबाबदारी सोपवली जाईल.” आता १२ दिवसांनंतर तिवारीची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. ट्विटरद्वारे त्याने सर्वांना याची माहिती दिली आहे.
तिवारीने ट्विटमध्ये लिहिले की, “हंगामाच्या मध्यांतरानंतर कार्तिकने कोलकातासारख्या मोठ्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याची हिंमतीची दाद द्यावी लागेल. मला अपेक्षा आहे की, आता तो एक फलंदाज उत्कृष्ट प्रदर्शन करेल.”
I’m glad Wat i thought on 4th of october came true. But i must confess it takes courage to step down from captaincy from a high profile team like KKR. I’m sure #DineshKarthik will rock as a batsman 👍 https://t.co/QfvqGJVT8E
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) October 16, 2020
दिनेश २०१८च्या आयपीएल हंगामापासून कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करत होता. कोलकाताने आयपीएलच्या १३ व्या हंगामात आत्तापर्यंत कार्तिकच्या नेतृत्वाखाली ७ सामने खेळले असून त्यातील ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला अगदी तिच्यासारखं पालक व्हायचं आहे,’ वाचा विराटने कुणाचे घेतले नाव
कोहलीचं टेन्शन वाढलंय, स्फोटक फलंदाजाचा आहे विराटच्या बॅटवर डोळा
पेटूराम रिषभ पंत सोशल मीडियावर होतोय ट्रोल, कमेंट पाहून तुम्हालाही फुटेल हसू
ट्रेंडिंग लेख-
यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे
आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण
IPL 2020 : अफाट कौशल्याने परिपूर्ण असलेले ४ खेळाडू, ज्यांना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी