आयपीएल २०२० मधील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी क्षेत्ररक्षण करताना दिल्ली संघाच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली होती.
दिल्ली संघातील वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या वडिलांचे मुंबईविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे तो भारतात परतला. त्यामुळे मोहितच्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी दिल्लीच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली होती.
मोहित शर्माने या हंगामात केवळ १ सामना खेळला होता. त्याने २० सप्टेंबरला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळलेल्या सामन्यात केवळ १ विकेट घेतली होती. दिल्ली कॅपिटल्सने हंगामातील दुसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता.
मोहितने आतापर्यंत ८६ आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने २६.८४ च्या सरासरीने ९२ विकेट्स घेतल्या आहेत.
यापूर्वी २२ ऑक्टोबरला मनदीप सिंगच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली देत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-“…म्हणूनच तू कठीण दिवसातही चांगली खेळी केली”, वडिलांच्या निधनानंतर मनदीपसाठी विराटचा भावुक संदेश
-…म्हणून चेन्नई आणि दिल्ली संघ काळीपट्टी बांधून उतरले होते मैदानात
-…म्हणून टीम इंडियाने आज हाताला बांधली काळी पट्टी
ट्रेंडिंग लेख-
-आज वाढदिवस असणाऱ्या विराट कोहलीने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!
-‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!