जवळजवळ प्रत्येक वर्षी आयसीसीच्या कोणत्या ना कोणत्या स्पर्धा सुरु असतात. आता आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपची नवी स्पर्धाही सुरु झाली आहे. याबरोबर अनेक वर्षांपासून आयसीसीच्या अंतर्गत वनडे विश्वचषक, टी२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी अशा स्पर्धा आयोजिक केल्या जातात.
या स्पर्धांमध्ये खेळायला मिळणे हे क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. तसेच प्रत्येक खेळाडूला वाटत असते की आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाला विजय मिळवून द्यावा आणि सामनावीर पुरस्कारही मिळवावा. क्रिकेट सामन्यात साधारण जो खेळाडू त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो, त्याला हा पुरस्कार दिला जातो.
पण असे काही दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अनेक सामने खेळले आहेत, तसेच त्यांनी त्यामध्ये चांगली कामगिरीही केली आहे, मात्र तरीही त्यांना आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकदाही हा पुरस्कार मिळाला नाही.
आयसीसी स्पर्धेत एकही सामनावीर पुरस्कार न मिळवता सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू –
१. मार्क बाऊचर – ५८ सामने (दक्षिण आफ्रिका)
२. मायकल क्लार्क – ४७ सामने (ऑस्ट्रेलिया)
३. दिनेश रामदिन – ४६ सामने (वेस्ट इंडिज)
४. राहुल द्रविड – ४१ सामने (भारत)
५. थिसेरा परेरा – ४० सामने (श्रीलंका)
६. ख्रिस हॅरीस – ३७ सामने (न्यूझीलंड)
७. नुवान कुलसेकरा – ३५ सामने (श्रीलंका)
८. काईल मिल्स – ३४ सामने (न्यूझीलंड)
९. अब्दुर रझाक – ३३ सामने (बांगलादेश)
१०. गौतम गंभीर – ३३ सामने (भारत)
११. जेम्स फ्रँकलिन – ३३ सामने (न्यूझीलंड)
१२. सईद अजमल – ३३ सामने (पाकिस्तान)
१३. इजाज अहमद – ३२ सामने (पाकिस्तान)
१४. मोहम्मद अमीर – ३२ सामने (पाकिस्तान)
(या लेखात वनडे विश्वचषक, टी२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन आयसीसी स्पर्धांचा आढावा घेतला आहे. यात कसोटी चॅम्पियनशिपचा समावेश नाही.)
वाचनीय लेख –
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
स्टोक्स झाला ओपनर ते ११व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा ५वा खेळाडू, पहा बाकी ४ क्रिकेटपटूंची नावं
विक्रम जरी मोडण्यासाठी असले तरी हे ३ विक्रम मोडणे केवळ अशक्य