---Advertisement---

झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा

On: मंगळवार, ऑगस्ट 11, 2020 10:46 AM
---Advertisement---

मुंबई । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी सोशल  मीडियापासून दूर आहे, तर त्यांची पत्नी सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव असते. लॉकडाऊनमध्ये साक्षीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहते धोनीबद्दल माहिती मिळवत होते. या काळात त्याची मुलगी जिवा देखील चर्चेत राहिले. नुकतेच साक्षीने जीवाचा फोटो शेअर केला आणि लोकांना विचार करायला लावले.

साक्षीने झिवाचा एक फोटो  शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका लहान मुलाला मांडीवर घेतलेली दिसत आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर साक्षीवर प्रश्नांचा भडीमार केला गेला. प्रत्येकजण तिला तिचा दुसऱ्या मुलाबद्दल विचारणा करीत होते. एवढेच नाही तर लोकांनी दुसर्‍या मुलाबद्दल साक्षीचे अभिनंदन केले. त्याचवेळी काही लोक म्हणतात की, हे हार्दिक पंड्याचे मुल आहे. पंड्या नुकताच एक पिता झाला आहे.

https://www.instagram.com/p/CDtgRU7n-Uw/

हार्दिक आणि धोनी एकमेकांचे खूप जवळचे आहेत. 7 जुलै रोजी धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, हार्दिक त्याचा भाऊ कृणाल आणि वहिनींसह वाढदिवस साजरा करण्यासाठी रांचीला गेला होता.

हार्दिक आणि धोनी दोघेही लवकरच मैदानावर दिसणार आहेत. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएई येथे होणार्‍या आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणार आहे तर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळेल. कोरोनामुळे भारतीय क्रिकेटपटू गेली पाच महिने मैदानापासून दूर आहेत, तर धोनी एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी विश्वचषकातील सेमी फायनलच्या सामन्यानंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन

-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा

-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर

-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे

-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---