जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येत असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेला आज (३ डिसेंबर) हॅमिल्टन येथील पहिल्या सामन्याने सुरुवात झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने दिवसाअखेर २ बाद २४३ अशी मजल मारली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनच्या नाबाद ९७ धावा, हे आजच्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले.
वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत यजमान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रियलने न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगला ५ धावांवर तंबूत धाडत विंडीजला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, तिसर्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार विलियम्सनने सलामीवीर टॉम लॅथमसह डाव सावरला. २१९ चेंडूत ९७ धावांची खेळी करताना विलियम्सनने १६ चौकार मारले. लॅथमने देखील त्याला तोलामोलाची साथ देताना १८४ चेंडूत ८६ धावांची खेळी केली.
लॅथम शतकाच्या दिशेने कूच करत असताना केमार रोचने त्याचा त्रिफळा उडवत माघारी पाठविले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनुभवी रॉस टेलरने सावध खेळी करत अजून पडझड होऊ न देण्याची काळजी घेतली. दिवसाअखेर विलियम्सन ९७ धावांवर, तर टेलर ३१ धावांवर नाबाद आहेत.
वेस्ट इंडिजतर्फे केमार रोचने ५३ धावा देत १ बळी मिळविला, तर शेनॉन गॅब्रियलने ६२ धावांत १ बळी घेत त्याला साथ दिली. कर्णधार जेसन होल्डरने १९ षटकांत केवळ २५ धावा देत किफायती गोलंदाजी टाकली, मात्र एकही गडी बाद करण्यात त्याला यश आले नाही.
पावसाच्या व्यत्ययामुळे आज ७८ षटकांचाच खेळ होऊ शकला. मात्र विलियम्सनची नाबाद खेळी आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ, यामुळे न्यूझीलंड मजबूत स्थितीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्विच हिटवर बंदी आणा’, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची आयसीसीकडे संतप्त मागणी
१५ वर्षांच्या टी२० क्रिकेट इतिहासात कोणालाही न करता आलेला पराक्रम डेविड मलानने केलाय
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव