भारतीय क्रिकेट चाहत्यांसह जगभरातील कोणताही चाहता 16 नोव्हेंबर, 2013 ही तारीख कधीच विसरू शकणार नाही. कारण याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आपला वानखेडे स्टेडिअमवरील शेवटचा म्हणजेच 200 वा कसोटी सामना खेळला होता. विशेष म्हणजे सचिनने अखेरचा सामना खेळण्याच्या बरोबर 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 14 नोव्हेंबर, 1989 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले होते. त्यानंतर 24 वर्षांची कारकिर्द घडवल्यानंतर आपल्या घरच्या मैदानावर सचिनने आपले शेवटचे निवृत्तीचे भाषण केले होते. यावेळी उपस्थित चाहते आणि अनेक खेळाडूंचे डोळे पाणावले होते.
झेल घेऊनही केला नाही आनंद साजरा
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात 182 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 495 धावांचा भलामोठा डोंगर उभा केला होता. यादरम्यान सचिनने 74 धावांची तडाखेबंद खेळी केली होती. त्यावेळी फिरकीपटू नरसिंग देवनारायणने डॅरेन सॅमीच्या हातून सचिनला झेलबाद केले होते. परंतु, तरीही सॅमीने झेल घेतल्यानंतर आनंद साजरा केला नव्हता.
यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 187 धावांवर संपुष्टात आला होता. अशाप्रकारे भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि 126 धावांनी आपल्या खिशात घातला होता. यानंतर कोणालाच नको असलेली गोष्ट सर्वांपुढे होती. ती म्हणजे सचिनच्या निवृत्तीचे भाषण.
सचिन- सचिन
सचिनने भाषण करताना म्हटले होते की, “वेळ खूप लवकर निघून गेला, परंतु, आठवणी नेहमी माझ्यासोबत राहतील. विशेषत: ‘सचिन- सचिन’ हे शब्द माझ्या कानावर तेव्हापर्यंत राहतील, जोपर्यंत मी श्वास घेणे बंद करत नाही.”
कर्क एडवर्ड्स आणि ख्रिस गेलला रडू कोसळले
सचिनने भाषण ऐकून यावेळी दोन खेळाडू यावेळी चक्क रडू लागले होते. ते दोन खेळाडू म्हणजेच वेस्ट इंडिजचे कर्क एडवर्ड्स आणि ख्रिस गेल.
क्रिकट्रॅकरशी इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ चॅटमध्ये बोलताना एडवर्ड्स म्हणाला होता की, “सचिनच्या त्या 200 व्या सामन्यावेळी मी तेथे होतो. तो क्षण माझ्यासाठी खूप भावुक होता. मी त्यावेळी चष्मा घातला होता आणि गेलच्या समोर उभा होतो.”
#OnThisDay in 2013: Sachin Tendulkar signed off his international career with an emotional farewell speechhttps://t.co/CUTlDY5XMR
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) November 16, 2020
“आम्ही दोघेही त्यावेळी रडत होतो. आम्ही आमच्या डोळ्यातून अश्रू न निघण्याचा प्रयत्न केला. परंतु, सचिनचे भाषण असे होते की, आम्ही स्वत:ला रोखू शकलो नाही. कारण आम्ही त्या व्यक्तीला पुन्हा कधीच क्रिकेटच्या मैदानावर खेळताना पाहू शकणार नाही,” असे तो पुढे बोलताना म्हणाला.
हा सामना जिंकत भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने खिशात घातली होती. त्यावेळी एडवर्ड वेस्ट इंडिजच्या अंतिम अकरा संघाचा भाग नव्हता.
सचिनची कारकीर्द
सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 200 कसोटी सामने, 463 वनडे सामने आणि 1 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले होते. यात त्याने कसोटीत 15921 धावा, वनडेत 18426 धावा आणि टी20त 10 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने शतकांचे शतकही ठोकले. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना कसोटीत 46 विकेट्स, वनडेत 154 विकेट्स आणि टी20त 1 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पोलार्डच्या निवृत्तीवर केलेल बुमराहचं ट्वीट आलं त्याच्याच अंगाशी, ‘हे’ वाचून चाहते भलतेच तापले
विश्वचषक जिंकताच इंग्लंडच्या प्रशिक्षकाने का केले मुंडन? कारण जाणून येईल हसू