बंगलोर। मागील वर्षी (2019)भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांनी भुवनेश्वर येथे झालेल्या सामन्यात विजय मिळवून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला होता. हा एफआयएच ऑलम्पिक पात्रता सामना आयकॉनिक कलिंगा स्टेडियममध्ये खेळला गेला होता. मनप्रीतसिंग यांच्या नेतृत्त्वाखालील पुरुष संघाने रशियाचा 11-3 ने पराभव केला होता. मनप्रीत सिंग याने या सामन्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
…अंगाला काटे आले होते
एक वर्षापूर्वी एफआयएच ऑलिम्पिक पात्रता सामन्याची आठवण करताना मनप्रीत म्हणाला की, “कलिंगा स्टेडियमवर खेळायला नेहमीच खूप चांगले वाटते. स्टेडियममधील वातावरण पाहून अंगावर काटा आला होता. सर्व प्रेक्षक भारतीय संघाला सहकार्य करत होते. आता आमचे लक्ष आगामी सामन्यांच्या तयारीवर असेल. जेणेकरून जेव्हा जेव्हा आम्हाला आंतरराष्ट्रीय संघांविरुद्ध खेळण्याची परवानगी मिळेल, तेव्हा तेव्हा आम्ही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी चांगल्या फॉर्ममध्ये येऊ.”
हॉकी इंडियाचे मानले आभार
खेळाच्या तयारीबद्दल बोलताना मनप्रीत म्हणाला की, “ऑलिम्पिकसाठी संघ चांगल्याप्रकारे तयारी करत आहे. कोव्हिड-19 या आजारामुळे देशात सुरू असलेली स्थिती पाहता ऑलिम्पिकच्या तयारीत काही अडथळे येणार नाहीत, याची खात्री केल्याबद्दल आम्ही एसएआय आणि हॉकी इंडियाचे आभारी आहोत.”
“आम्ही एक मजबूत संघ तयार करीत आहोत. आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रशिक्षणाची तयारी केल्याबद्दल मुख्य प्रशिक्षक आणि विशेषत: आमचे वैज्ञानिक सल्लागार रॉबिन आर्केल यांना धन्यवाद देतो. यांच्यामुळेच आम्ही परत त्याच फिटनेस पातळीवर गेलो आहोत आणि उच्च तीव्रतेच्या सराव सत्रात खेळाची वरची पातळी गाठू शकलो आहोत,” असेही तो पुढे बालताना म्हणाला.
वाचा-
-त्यावेळी चाहत्यांनी केलेलं स्वागत पाहून भारावून गेलो – रिना खोकर
-‘भारतीय संघाची जर्सी मिळवण्याची वाट पाहात आहे’, दुखापतीतून सावरलेल्या युवा हॉकीपटूची प्रतिक्रिया
-आनंदाची बातमी! दीर्घ काळानंतर महाराष्ट्रातील हॉकीपटूंनी सुरु केला सराव