बेंगलोर । सन 2016 मध्ये एफआयएच ज्युनियर पुरुष विश्वचषक जिंकणार्या भारतीय कोल्टस संघामधील लोकप्रिय नाव म्हणजे दिप्सन तिर्की. 2019 मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती त्यामुळे तो काही सामन्यांमधून बाहेर पडला होता. आता त्याने पुमरागमन केले आहे. भारतीय हॉकी संघाकडून खेळण्याची त्याला आशा आहे.
दोन वर्षे होती आव्हानात्मक
लखनऊ येथे एफआयएच ज्युनियर पुरुष विश्वचषक (2016) जिंकणार्या इंडिया कॉलट्स संघाचा उपकर्णधार तिर्की म्हणाला की, “गेली दोन वर्षे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होती. काही स्पर्धांमध्ये मी कनिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परत गेलो होतो, तेव्हा शस्त्रक्रियेमुळे मी 2019 मध्ये सामन्यांमधून बाहेर पडलो होतो. पुनरागमनासाठी मला थोडा वेळ लागला. आता मला माझी क्षमता दर्शवण्यासाठी आणखी एक संधी दिली गेली आहे, मला त्याचा पूर्ण उपयोग करायचा आहे.”
मूलभूत गोष्टींवर करत आहे लक्ष केंद्रित
खेळाबद्दल बोलताना तिर्की म्हणाला की, “लॉकडाऊननंतर आम्ही हळू हळू उपक्रम सुरू केले आहेत. आम्ही आपल्या सरावाच्या वेळेत वाढ करत आहोत. मूलभूत गोष्टींवर लक्ष्य केंद्रीत करत आहोत. मला वाटते की ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे. ड्रॅग फ्लिकिंग कौशल्यांवर काम करन्यावर आणि कौशल्य अधिक सुधारण्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे.”
भारताची जर्सी मिळवण्याची पाहत आहे वाट
सध्या प्रवासाच्या निर्बंधांमुळे भारत यावर्षी कोणत्याही स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नसला, तरी तिर्कीला आशा आहे की तो पुन्हा भारताची जर्सी मिळवेल.
“मी प्रत्येक सत्रात माझे 100 टक्के देण्याचे काम करीत आहे. मी मागच्या वेळी 2018 मध्ये सुलतान अझलान शाह चषक स्पर्धेत भारताकडून खेळलो होतो आणि पुन्हा भारताची जर्सी परत मिळवण्याची मी वाट पाहत आहे. कोअर ग्रुप मजबूत आहे कारण त्यामध्ये काही चांगले खेळाडू आहेत. पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी मला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल आणि मी त्या दृष्टीने सकारात्मक मनाने काम करत आहे,” असेही पुढे बोलताना तिर्की म्हणाला.
वाचा-
-“विरोधकांवर दबाव आणल्यास चांगले परिणाम मिळतात”, भारतीय युवा हॉकीपटूची प्रतिक्रिया
-भारतीय हॉकी संघ टोकियो ऑलम्पिकपर्यंत सामर्थ्यवान होण्याचा ‘या’ हॉकीपटूला विश्वास