आंतरराष्ट्रीय हॉकी फेडेरेशन प्रो लीगमधील महिलांच्या सामन्यात नेदरलँड संघाने ब्रिटनचा पराभव केला. या सामन्यात ब्रिटनने अखेरपर्यंत हार मानली नव्हती. ब्रिटनने नेदरलँडला दिलेल्या लढ्यातून भारतीय युवा हॉकीपटू उदिताने बोध घेतला आहे. स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करण्याचाही तिने निर्धार केला आहे.
विरोधकांवर दबाव आणल्यास मिळतात चांगले परिणाम
नेदरलँड आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या सामन्याविषयी बोलताना उदिता म्हणाली की, “जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा संघ नेदरलँड्ला सामन्यात खेळताना पाहून चांगले वाटले. जागतिक क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर असणाऱ्या ब्रिटनने ज्या प्रकारे प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणला हे पाहूनही अधिक चांगल वाटलं. जरी ब्रिटन पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करू शकला नाही, तरीही त्यांनी दबाव कायम ठेवला आणि सामना बरोबरीत रोखला. विरोधकांवर सतत दबाव आणल्यास चांगले परिणाम मिळतात. जेव्हा आपण पिछाडीवर असतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.”
ग्रेट ब्रिटनने केली प्रेरणादायी कामगिरी
ग्रेट ब्रिटनच्या संघाबद्दल बोलताना ती म्हणाली की, “नेदरलँड्ने पेनल्टी शूट-आउटमध्येच सामना संपवला होता. परंतु ग्रेट ब्रिटनने संपूर्ण सामन्यात ज्या पद्धतीने लढा दिला, ते पाहून आश्चर्य वाटलं. कोणत्याही परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी कायम ठेवणे फार महत्वाचे आहे. ग्रेट ब्रिटनने खूप प्रेरणादायक कामगिरी केली. पूर्ण वेळ संघाला सामन्यामध्ये टिकवून ठेवण्याचे त्यांनी दाखवून दिले”
खेळात करायची आहे सुधारणा
भारतीय ऑलम्पिक संघात स्थान मिळवण्याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “पुढील काही महिने माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण मला खेळात सुधारणा करायची आहे. भारतीय ऑलिम्पिक संघात स्थान मिळवण्याची माझ्याकडे संधी आहे. खेळ सुधारण्यासाठी माझ्या प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंशी मी खेळाच्या काही पैलूंबद्दल सतत चर्चा करत आहे. मी अद्याप आंतरराष्ट्रीय कारकिर्दत फार मोठा पल्ला गाठला नाही. यात बदल करण्याचा मी निर्धार केला आहे. लांब विश्रांतीनंतर मैदानावर परत येऊन चांगलं वाटलं. मला येत्या काही महिन्यांत माझे कौशल्य दाखवण्याची संधी आहे. आम्ही हॉकी इंडियाचे योग्य वेळी कार्यपद्धती योग्यरित्या पार पाडल्याबद्दल आभारी आहोत. जेणेकरून आम्ही मैदानात परत येऊ शकलो आणि खेळात सुधार करू शकलो.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय हॉकी संघ टोकियो ऑलम्पिकपर्यंत सामर्थ्यवान होण्याचा ‘या’ हॉकीपटूला विश्वास
भारतासाठी ऑलिंपिक पदक जिंकण्याचे आहे स्वप्न, ‘या’ हॉकीपटूने व्यक्त केली इच्छा
ऑलिंपिकमध्ये नेदरलँडला पराभूत करण्यासाठी करावी लागेल ‘ही’ गोष्ट