---Advertisement---

भारतासाठी ऑलिंपिक पदक जिंकण्याचे आहे स्वप्न, ‘या’ हॉकीपटूने व्यक्त केली इच्छा

On: रविवार, ऑक्टोबर 25, 2020 4:59 PM
---Advertisement---

भारतीय पुरुष हॉकी संघाचा मिडफिल्डर विवेक सागर प्रसादने आतापर्यंतच्या छोट्या कारकीर्दीत बरेच यश मिळवले आहे. 20 वर्षीय सागर एफआयएच पुरुष हॉकी संघाचा सदस्य आहे. याच संघाने भुवनेश्वर (ओडिशा) 2019 मध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. भारतासाठी ऑलिंपिक पदक जिंकणे हे सर्वात मोठे स्वप्न आहे असे विवेकने सांगितले.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एफआयएच ऑलिंपिक पात्रता सामन्यातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये पदार्पण केल्याने प्रसाद उत्साही आहे, परंतु भारतीय संघासाठी दीर्घ कालावधीसाठी सातत्य राखता येईल, तेव्हाच मला समाधान होईल, असे त्याने म्हटले आहे.

स्वप्नवत होती सुरुवात – विवेक

त्याच्या खेळाबद्दल बोलताना तो म्हणाला की, “माझ्यासाठी निश्चितच ही एक स्वप्नवत सुरुवात झाली आहे. एफआयएच राइजिंग स्टार ऑफ द इयर अवॉर्ड 2019 जिंकून मला प्रोत्साहन मिळाले. तथापि, मी भारतीय संघासाठी काही काळ सुसंगत राहू शकलो तरच मी माझ्या कामगिरीवर समाधानी राहाणार आहे. दीर्घ कालावधी तसेच बर्‍याच मोठ्या स्पर्धांमध्येही मला सातत्य राखायचे आहे.”

ऑलम्पिक पदक जिंकण्याचे आहे स्वप्न

आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठ्या ध्येयाबद्दल सांगताना प्रसाद म्हणाला की पुढच्या वर्षी भारताला ऑलिंपिक पदक जिंकवून देण्यात हातभार लावायचा आहे.

“ऑलिंपिक हा आपल्या खेळाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताला ऑलिंपिक पदक जिंकवून देणे हे माझे सर्वात मोठे स्वप्न आहे. टोकियोमध्ये इतिहास घडविण्याचा आत्मविश्वास असलेला एक महान संघ आपल्याकडे आहे. मी सर्वोत्तम संघांविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी उत्सुक आहे. जर आम्ही आमच्या पूर्ण सामर्थ्यानी खेळलो तर आम्ही पुढच्या वर्षी टोकियोहून निश्चितच पदक घेऊन परतू,” असेही पुढे बोलताना तो म्हणाला

महत्त्वाच्या बातम्या –

ऑलिंपिकमध्ये नेदरलँडला पराभूत करण्यासाठी करावी लागेल ‘ही’ गोष्ट

ऑलिंपिक पुढे ढकलण्यात आल्यामुळे युवा खेळाडूंना होणार फायदा : दिलप्रीत सिंग

…तर ऑलिंपिकसारख्या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला खूप मदत मिळेल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---