मुंबई ।इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यास अजून 3 आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे. 19 सप्टेंबरपासून या स्पर्धेस प्रारंभ होत आहे. यावेळी जगातील सर्वात ही मोठी क्रिकेट लीग युएईमध्ये होणार आहे. कोरोनामुळे बीसीसीआयने खेळाडूंच्या सुरक्षेसाठी युएईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाईल.
आयपीएल म्हटलं की नेहमीच चौकार-षटकारांची चर्चा होते. खरंतर टी20 क्रिकेट हे वेगवान खेळींसाठीच जास्त प्रसिद्ध आहे. यामध्ये प्रत्येक फलंदाज जेवढे शक्य आहे, तेवढे जलदगतीने धावा करण्याचा प्रयत्न करत असतो. आत्तापर्यंत 26 वेळा आयपीएलमध्ये फलंदाजांनी 20 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत अर्धशतके झळकावली आहेत. यात 4 असे फलंदाज आहेत ज्यांनी 20 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत 2 वेळा अर्धशतके केली आहेत.
आज या लेखात आम्ही तुम्हाला त्या 4 फलंदाजांविषयी सांगणार आहोत ज्यांनी 20 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत 2 वेळा अर्धशतक ठोकण्याचे कामगिरी केली आहे.
1. डेव्हिड वॉर्नर –
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये 4 शतके ठोकली आहेत, तसेच 44 अर्धशतके ठोकली आहेत. यातील 2 अर्धशतके तर त्याने 20 चेंडूंमध्ये पूर्ण केली होती. 30 एप्रिल 2017 रोजी वॉर्नरने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध 20 चेंडूंमध्ये अर्धशतक लगावले होते. त्याआधी 2 मे 2015 रोजीही वॉर्नरने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 20 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला होता.
2. सुनील नरेन –
सुनील नरेन आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जात असला तरी अलीकडच्या काळात तो टी -20 क्रिकेटमध्ये एक मोठा अष्टपैलू म्हणून पुढे आला आहे. आयपीएलमध्ये नरेनने 20 चेंडूत दोनदा अर्धशतके ठोकले आहे. त्याने पहिल्यांदा अर्धशतक 7 मे 2017 रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध अवघ्या 15 चेंडूत झळकावले होते. यानंतर, 2018 मध्ये नरेनने पुन्हा एकदा आरसीबी गोलंदाजांचा समाचार घेतला आणि अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक झळकावले.
3. केएल राहुल –
आयपीएलमधील वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या या सलामीवीराने 8 एप्रिल 2018 ला अवघ्या 14 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने दिल्ली कॅपिटलच्या विरूद्ध अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर केएल राहुलनेही 2019 मध्ये मोहाली येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. राहुल आयपीएल 2020 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाचे नेतृत्वही करणार आहे.
4. कायरन पोलार्ड –
मुंबई इंडियन्स संघाचा फिनिशर कायरन पोलार्डनेही 20 पेक्षा कमी चेंडूंमध्ये दोन अर्धशतके ठोकली आहेत. पोलार्डने 17 आणि 20 चेंडूत आयपीएलमध्ये त्याची वेगवान अर्धशतके झळकावली आहेत. 28 एप्रिल 2016 रोजी, पोलार्डने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. याआधी पोलार्डने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2013 च्या मोसमात अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
ट्रेंडिंग लेख –
‘धोनी रोज पितो ५ लिटर दूध’ सारख्या लहानपणी तुम्ही ऐकलेल्या क्रिकेटबद्दलच्या ५ खोट्या गोष्टी
आयपीएलच्या अर्ध्यातच संघाचे कर्णधारपद सोडणारे ५ क्रिकेटपटू
आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी कर्णधारपदावरून काढत वगळले होते संघातून, आता त्याच खेळाडूने ठोकले त्रिशतक
बाप क्रिकेटर विराट कोहली होणार बाबा, इंस्टाग्रामवरुन केली घोषणा