बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज अल-अमीन हुसेनने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबद्दल आपले मत स्पष्ट केले आहे. त्याच्या मते विराट इतर फलंदाजांच्या तुलनेत खूप वेगळा आहे. तो प्रत्येक चेंडूवर गोलंदाजाला स्लेज (अपशब्द) करतो. इतर फलंदाज चांगल्या चेंडूचा सामना करतात, परंतु विराट थेट गोलंदाजाला स्लेज करतो.
बांगलादेशच्या क्रिकफ्रेंजी वेबसाईटच्या फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना हुसेन (Al-Amin Hossain) म्हणाला की, “जेव्हा तुम्ही विराटला निर्धाव चेंडू टाकाल, तेव्हा तो तुम्हाला स्लेज करेल. तो तुम्हाला अशा शब्दात बोलेल जे तुम्ही प्रेक्षकांसमोर सांगू शकणार नाहीत. तो गोलंदाजांवर दबाव बनविण्याचा प्रयत्न करतो आणि मानसिकरित्या त्यांना त्रास देतो.”
विराट अनेकवेळा विरोधी संघाच्या खेळाडूंबरोबर शाब्दिक वाद घालताना दिसला आहे. यानंतर विराटचा उत्साह वाढलेला पहायला मिळाला आहे.
हुसेन पुढे म्हणाला की, “मी ख्रिस गेल, शिखर धवन, रोहित शर्मा आणि जगभरातील इतर दिग्गज फलंदाजांना गोलंदाजी केली आहे. यांपैकी कोणताही फलंदाज अशाप्रकारे वागत नाही. जेव्हा तुम्ही चांगला चेंडू फेकता, तेव्हा ते त्या चेंडूचा सामना करतात. परंतु विराट असे करत नाही. तो तुम्हाला प्रत्युत्तराच्या रुपात स्लेज (Sledge) करतो.
यापूर्वी, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेननेही विराटबरोबरचे आपले तणावाचे किस्से शेअर केले होते. यामध्ये १९ वर्षांखालील सामन्यादरम्यान झालेल्या वादाचाही समावेश होता.
रूबेलने तमीम इकबालबरोबरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये म्हटले होते की, “तो तेव्हा खूप स्लेजिंग करत होता. मला वाटते की, राष्ट्रीय संघातील खेळाडूंबरोबर तो कमी स्लेज करतो.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-कोरोना पुढे आयसीसीही हतबल, केल्या २ महत्त्वाच्या विश्वचषकाच्या स्पर्धा रद्द
-मुंबई इंडियन्समधून लसिथ मलिंगा बाहेर, रोहितलाही वाटले वाईट
-म्हणून तब्बल १ वर्ष सचिन समोर जेवण करत नव्हता हा भारतीय क्रिकेटपटू