मुंबई । पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दावा केला आहे की, कारगिल युद्धामध्ये भाग घेण्यासाठी काऊन्टी क्रिकेटची ऑफर त्याने नाकरली होती. अख्तर यांनी सांगितले की, इंग्लिश काउंटी कल्ब नॉटिंगहॅमशायर कडून त्याला 1 लाख 75 पाऊंड्सचा प्रस्ताव आला होता, जो त्याने नकारला होता. कारगिल युद्धामध्ये 16 हजार फूट उंचीवर झालेल्या लढाईत 1 हजार पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर 527 भारतीय सैनिक शहीद झाले.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शोएब अख्तर म्हणाला की, “ही कहाणी लोकांना फारशी माहिती नसेल. माझ्याकडे नॉटिंघॅमच्या 1 लाख 75 पाऊंड्सचा प्रस्ताव होता. त्यानंतर 2002 मध्ये आणखी एक मोठा कराराचा प्रस्ताव आला होता. मी दोन्ही ऑफर नाकारल्या होत्या.”
तो म्हणाला की, “मी लाहोरच्या सीमेवर होतो. मग एका जनरलने मला विचारले की येथे काय करीत आहे. यानंतर मी म्हणालो की युद्ध सुरू होणार आहे आणि आपण एकत्र मरू. काऊन्टीचा प्रस्ताव मी दोन वेळा नाकारल्याने क्लब देखील आश्चर्यचकित झाले. पण मला काळजी नव्हती. काश्मीरमधील माझ्या मित्राला फोन करुन सांगितलो की मी लढायला तयार आहे.”
शोएब अख्तर वारंवार म्हणतो की, “खेळ आणि राजकारण वेगळे ठेवले पाहिजे. मैदानावर दोन्ही संघांमध्ये चांगली टक्कर होत असूनही दोन्ही संघांचे खेळाडू मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत.”
तो पाकिस्तानकडून 46 कसोटी, 163 वनडे आणि 15 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.