---Advertisement---

‘सीपीएलमधून येणाऱ्या खेळाडूंना होणार आयपीएलमध्ये फायदा,’ विश्वविजेत्या खेळाडूने केले वक्तव्य

On: शनिवार, ऑगस्ट 15, 2020 5:55 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये खेळून येणाऱ्या खेळाडूंना आयपीएलमध्ये फायदा होईल, असे भारतीय संघाचा माजी गोलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहराचे मत आहे. सीपीएल २०२० स्पर्धेचे आयोजन १८ ऑगस्टपासून होणार आहे, तर अंतिम सामना १० सप्टेंबरला खेळण्यात येणार आहे. सीपीएल स्पर्धेचे आयोजन त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या २ स्टेडिअममध्ये खेळण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय स्पर्धा आयपीएलच्या १३ व्या स्पर्धेचे आयोजन यूएईत १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान खेळण्यात येणार आहे. नेहराने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हटले की, “मला असे म्हणायचे आहे की, सीपीएलमध्ये जे खेळाडू खेळतील, तर याची कोणतीही शाश्वती नाही की ते खेळाडू तिथे जी कामगिरी करतील तीच कामगिरी आयपीएलमध्येही करतील. परंतु त्यांना सीपीएलमध्ये खेळल्यामुळे आयपीएलमध्ये नक्कीच फायदा होईल.”

“जर तुम्ही एक महिना क्रिकेट खेळल्यानंतर आयपीएलमध्ये पोहोचता, तर त्यामुळे निश्चितच फरक पडेल. मग तो खेळाडू कायरन पोलार्ड असो, इम्रान ताहिर असो किंवा राशिद खान,” असेही तो म्हणाला. नेहराने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरची प्रशंसा केली आहे.

“आजही ताहिर विकेट घेण्याची क्षमता ठेवतो. तो १८-२० वयाच्या मुलाप्रमाणे आनंद साजरा करतो. तो खूप समर्पित खेळाडू आहे. जेव्हा आपण एका निश्चित वयाबद्दल चर्चा करतो, तेव्हा या वयात तुम्हाला अधिक सामने खेळायला मिळतात. आणि अधिक सराव करण्याची संधी मिळते. त्यामुळे हे चांगले असते. सीपीएलनंतर आयपीएलमध्ये खेळताना ताहिर चांगली कामगिरी करेल,” असेही तो पुढे म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाकिस्तानी कर्णधाराला बॉल आउटचा नियमच माहित नव्हता; भारतीय अष्टपैलू खेळाडूचा खुलासा

-इम्रान खान स्वत:ला देव समजतोय; त्याला मी पंतप्रधान केलंय, माजी क्रिकेटर कडाडला

-१३ वर्षांपुर्वी सरावावेळी झाली दुखापत; हुकली भारताकडून कसोटी खेळण्याची संधी, रुममध्ये जाऊन ढसाढसा रडला हा क्रिकेटर

ट्रेंडिंग लेख-

-वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे २ संघ

-कोण होणार कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० चा किंग?

-भारताच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेले ३ भारतीय क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---