---Advertisement---

‘या’ अभिनेत्रीच्या ‘बेली डान्स’वर सलामीवीर पृथ्वी शॉ घायाळ; पाहा Video

On: सोमवार, नोव्हेंबर 23, 2020 11:51 PM
---Advertisement---

जवळपास अडीच महिन्यांच्या प्रदीर्घ दौऱ्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. क्वारंटाइन‌ कालावधी संपल्यानंतर भारतीय संघाने सरावाला सुरुवात करत मालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. इतर खेळाडूंसोबत युवा सलामीवीर पृथ्वी शॉदेखील सरावादरम्यान घाम गाळताना दिसला होता. आगामी ऑस्ट्रेलिया दौरा तसेच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींमुळे पृथ्वी सध्या चर्चेत आहे.

कथित प्रेयसीच्या व्हिडिओला केले लाईक

पृथ्वी अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सोशल मीडियावरून त्याने केलेल्या काही कमेंट्समुळे असा अंदाज वर्तविला गेला होता. प्राची आणि पृथ्वी दोघेही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट्स करताना दिसून येतात. प्राचीने आज (२३ नोव्हेंबर) सकाळी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्वतःच्या ‘बेली डान्स’ व्हिडिओला पृथ्वीने काही मिनिटातच लाईक केल्याचे समोर आले आहे.

https://www.instagram.com/p/CH7wxmJJrmt/?utm_source=ig_web_copy_link

खराब फॉर्ममधून जात आहे पृथ्वी

कोविड-१९ च्या कारणाने लागलेल्या लॉकडाऊनमुळे पृथ्वी जास्त क्रिकेट खेळू शकला नाही. त्याआधी तो काही काळ दुखापतग्रस्त होता. वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडमध्ये झालेल्या वनडे मालिकेतही तो अपयशी ठरलेला. नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये तो उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघाचा सदस्य होता. मात्र, त्याला स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसत.

नवोदित अभिनेत्री आहे प्राची सिंग

दुसरीकडे, प्राची सिंग ही नवोदित अभिनेत्री आहे. ती एका प्रसिद्ध मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसली होती. प्राची मॉडेलिंग आणि एक उत्तम बेली डान्सर म्हणून ओळखली जाते. सध्या ती पृथ्वी शॉची कथित प्रेयसी म्हणून चर्चेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोहम्मद सिराजच्या घातक चेंडूवर पृथ्वी शॉ क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

वॉर्नरने घेतलं ‘बिग-बीं’चं रूप, सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना विचारला प्रश्न

चेन्नईविरुद्ध दिल्लीच्या विजयाचा नायक ठरलेल्या पृथ्वी शॉने केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---