काल (१५ ऑगस्ट) कॅप्टनकूल एमएस धोनीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यावेळी बॅकग्राउंडला ‘मै पल दो पल का शायर हूँ’ हे गाणे टाकत आपल्या क्रिकेट कारकिर्दीची झलक दाखवणारा एक व्हिडिओ धोनीने शेअर केला.
आपल्या १५ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत धोनीने भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तो जगातील एकमेव असा कर्णधार आहे, ज्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. धोनीने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याच्या चतुर नेतृत्त्वाची, शानदार यष्टीरक्षण कौशल्याची आणि दमदार फलंदाजीची नेहमी आठवण काढली जाईल.
धोनीच्या निवृत्तीनंतर चाहत्यांसह अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. धोनीची पत्नी साक्षी धोनीनेही तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन धोनीला एक संदेश देत त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Sakshi Dhoni Share Her Feelings On MS Dhoni Retirement
साक्षीने इंस्टाग्रामवर लिहिले की, “तू जे काही मिळवल आहे त्यावर तुला गर्व असायला पाहिजे. क्रिकेटमध्ये तुझे सर्वश्रेष्ट देण्यासाठी तुला शुभेच्छा. मला तुझ्या उपलब्धि आणि तुझ्यावर गर्व आहे. मला विश्वास आहे की, तू तुझ्यातील क्रिकेटच्या उत्कट भावनांना निरोप देण्यासाठी तुझ्या अश्रूंना थांबवून ठेवले असणार. तुला चांगले स्वास्थ, आनंददायी जीवन आणि भविष्यात शानदार गोष्टी मिळाव्यात, एवढीच इच्छा व्यक्त करते.”
याबरोबरच साक्षीने माया एंजेलोच्या खूप सुंदर ओळी लिहिल्या आहेत. “लोक विसरून जातील तू काय सांगितले होते, लोक विसरून जातील तू काय केले होते, पण तू लोकांना ज्या भावना दिल्या आहेत, त्यांना ते कधीच विसरणार नाहीत.”
गतवर्षीचा विश्वचषकातील उपांत्य सामना धोनीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला. त्यापुर्वी धोनीने ३५० वनडे सामने खेळले होते. दरम्यान त्याने १० शतके करत १०७७३ धावा केल्या होत्या. तर, ९८ टी२० सामने खेळत १६१७ धावा आणि ९० कसोटी सामन्यात ६ शतके करत ४८७६ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबर आझमसहित पाकिस्तानच्या क्रिकेटरला आयपीएल खेळू द्या, पहा कोण करतंय ही मागणी
सतत धोनीवर आगपाखड करणाऱ्या गौतम गंभीरने आज धोनीला…
जर्सी नंबर ७ रिटायर करा, धोनीमुळे करियरची वाट लागलेला खेळाडूचं म्हणतोय हे
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमधील हे १० विक्रम आहेत केवळ एमएस धोनीच्याच नावावर
५ असे गोलंदाज, ज्यांनी धोनीला करु दिल्या नाहीत शेवटच्या ओव्हरमध्ये धावा
जीवनातील या ८ महत्त्वाच्या गोष्टी, ज्या धोनीकडून आहेत शिकण्यासारख्या