नवी दिल्ली। बाबर आझमसहित पाकिस्तान संघाचे इतर खेळाडूदेखील आयपीएलमध्ये खेळताना दिसले पाहिजेत, असे इंग्लंडचे माजी दिग्गज कर्णधार नासिर हुसेन यांचे मत आहे. २००८ नंतर म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या हंगामानंतर आतापर्यंत पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसलेले नाहीत. आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान यूएईत होणार आहे.
हुसेन यांनी आयपीएलचा प्रभाव आणि महत्त्वावर जोर देत म्हटले की, राजकीय तणाव असूनही पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. भारत आणि पाकिस्तान संघात शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२मध्ये खेळण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत हे संघ केवळ विश्वचषक आणि आशिया चषकातच एकमेकांचा सामना करताना दिसतात.
हुसेन म्हणाले की, “मला राजनीतिमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. परंतु भारत आणि पाकिस्तान संघाचे एकमेकांविरुद्ध खेळणे हे असे आहे, जसे की प्रीमियर लीगमध्ये मॅंचेस्टर सिटीचा संघ मँचेस्टर युनायटेडविरुद्ध किंवा एव्हर्टन- लिव्हरपूलविरुद्ध न खेळणे.”
हुसेन यांनी हा देखील इशारा दिला की, आझम आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे आणि त्याला आयपीएलमध्ये खेळल्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो.
आझमचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सरासरी ही ५० पेक्षा अधिक आहे. २०१९ मध्ये नेटवेस्ट टी२० ब्लास्टमध्ये त्याने ५७८ धावा केल्या होत्या. त्यादरम्यान त्याची फलंदाजी सरासरी ही ५२.५४ इतकी होती तसेच त्याचा स्ट्राईक रेट हा १४९.३५ इतका होता.
हुसेनने म्हटले की, “पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये नसतील. आयपीएल लवकरच सुरू होणार आहे आणि आझम त्यामध्ये खेळणार नाही. तो एक प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याने आयपीएलमध्ये खेळले पाहिजे.”
हुसेन यांनी यापूर्वीही बाबर आझमची प्रशंसा केली आहे. त्यांनी म्हटले होते की, “जर बाबर विराट कोहली असता, तर प्रत्येक जण त्याच्याबद्दल चर्चा करत असता. परंतु हा बाबर आझम आहे, कोणीही याच्या बाबतीत चर्चा करत नाही. तो युवा आहे, हुशार आहे आणि त्याचा आपला स्वॅग आहे.”
त्यांचे असे मत आहे की, आता फॅब फोरमध्ये विराट कोहली, जो रूट, केन विलियमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या जागी फॅब फाईव्हची चर्चा झाली पाहिजे आणि त्यामध्ये बाबर आझमला सामील केले पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल ठरली! आता धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार ते पण ठरलं!
-‘सीपीएलमधून येणाऱ्या खेळाडूंना होणार आयपीएलमध्ये फायदा,’ विश्वविजेत्या खेळाडूने केले वक्तव्य
-भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटरची तब्येत नाजूक, आहे व्हेंटिलेटरवर सपोर्टवर
ट्रेंडिंग लेख-
-क्रिकेट विश्वात का आहे भारतीय संघाचा दबदबा, ही आहेत ५ कारणे
-राजस्थान रॉयल्सचे हे ३ गुणवंत खेळाडू अचानक झाले आयपीएलमधून गायब
-आयपीएल २०२०: या ५ कारणांमुळे केएल राहुल कर्णधार म्हणून होऊ शकतो यशस्वी