---Advertisement---

आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकणार नाही मुंबई इंडियन्सचा हा फलंदाज; या दिग्गजांनी केलाय दावा

On: गुरूवार, सप्टेंबर 10, 2020 3:07 PM
---Advertisement---

मुंबई । आयपीएल सुरू होण्यास जास्त वेळ शिल्लक नाही. याची सुरुवात 19 सप्टेंबरपासून चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यापासून होणार आहे. आतापर्यंत भारताचे खेळाडू आणि संघातील बहुतेक परदेशी खेळाडू आपापल्या संघात सामील झाले आहेत, परंतु मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज  फलंदाज ख्रिस लिन अद्याप संघात सामील झाला नाही. त्याचे कारण म्हणजे तो कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे.  या स्पर्धेत लिनची कामगिरी निराशाजनक आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि आशिष नेहरा यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल मत दिले आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकर आणि माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी जवळजवळ एकच गोष्ट सांगितली आहे की, आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स क्वचितच ख्रिस लिनला संधी देईल. या दोन्ही दिग्गजांनी यामागे अनेक युक्तिवादही केले आहेत.

आशिष नेहरा म्हणाला की, “कॅरिबियन प्रीमियर लीग अर्थात सीपीएल 2020 मध्ये ख्रिस लिनचा फॉर्म चांगला नाही, ज्यामुळे त्याला आयपीएलमध्ये फारच जास्त संधी मिळतील असे वाटत नाही. पहिली गोष्ट म्हणजे त्याची सीपीएलमध्ये चांगली कामगिरी नाही म्हणून त्याची आयपीएलसुद्धा खराब जाऊ शकते, सीपीएल चांगला झाली असता तर त्याचा आत्मविश्वास वाढला असता आणि त्याला अधिक संधी मिळाल्या असत्या.”

समालोचक संजय मांजरेकर म्हणाले, “मला वाटते की ख्रिस लिनला मुंबई इंडियन्सकडून एकही सामना मिळू शकणार नाही, कारण त्याच्याकडे संघात क्विंटन डी कॉक आणि ईशान किशन आहेत.”  ख्रिस लिनने कॅरेबियन प्रीमियर लीगच्या 9 सामन्यांत 138 धावा केल्या आहेत. तो आयपीएल 2019 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडूनही खूप खेळला आहे.”

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल इतिहासातील पहिल्याच सामन्यात वादळी खेळी करणाऱ्या ब्रँडन मॅक्युलमला गांगुली म्हणाला होता, तूझे आयुष्य…

लीग भारतीय आहे पण मग भारतीय मुख्य प्रशिक्षक किती? या दिग्गज खेळाडूने विचारला प्रश्न

चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या युवा खेळाडूला रोहित शर्माने दिल्या टिप्स; पहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख –

भारताच्या १९ वर्षांखालील संघातील हे ३ खेळाडू आयपीएलसाठी सज्ज, अंतिम अकरामध्ये स्थान निश्चित

गोलंदाजी, फलंदाजी, म्हणाल तिथे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षणसुद्धा करणारा खराखुरा ऑलराऊंडर

…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---