मुंबई । 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात संजय मांजरेकर समालोचन करताना दिसणार नाहीत. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने या माजी भारतीय क्रिकेटपटूचा समावेश सात भारतीय समालोचकांच्या समितीमध्ये केलेला नाही. आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये मांजरेकर हे प्रथमच दिसणार नाहीत. 2008 पासून तो सतत समालोचन करत आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाचा संजय मांजरेकरांवर राग आहे. लॉकडाउनच्या ठीक आधी मार्च महिन्यात मांजरेकर यांना मुख्य कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकले गेले होते, त्यानंतर त्यांनी बोर्डाच्या अॅपेक्स कौन्सिलला ई-मेलद्वारे आयपीएल कॉमेंट्री पॅनलमध्ये ठेवण्याची विनंती केली. त्यांनी मेलमध्ये लिहिले की, आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्यात मला आनंद होईल. कारण आम्ही सर्वजण ते करीत आहोत जे प्रक्षेपणासाठी चांगले आहे.
कोरोना काळात हा 13 वा हंगाम बायो बबलमध्ये खेळला जाईल. प्रत्येक फ्रेंचायजी सावधगिरीने राहत आहे. समालोचक तीन गटात विभागले जातील आणि दोन स्वतंत्र बायो बबलमध्ये ठेवण्यात येतील. 10 सप्टेंबर रोजी सर्वजण युएईला रवाना होणार आहेत. या स्पर्धेची अंतिम फेरी 10 नोव्हेंबर रोजी खेळली जाईल.
पॅनेलमधील या सात भारतीय समालोचकांची नावे
यावेळी आयपीलच्या समालोचनासाठी सुनील गावस्कर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, रोहन गावस्कर, हर्षा भोगले आणि अंजुम चोप्रा यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय महिला संघातील दिग्गज खेळाडू अंजूम चोप्रा हीदेखील आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसून येईल.
अबू धाबीमधून दीप दासगुप्ता आणि मुरली कार्तिक हे समालोचन करतील, तर इतर समालोचक शारजाह आणि दुबई येथील सामन्यात समालोचन करताना दिसून येतील. दुबई आणि अबूधाबी येथे 21 सामने, त्यानंतर शारजाहत एकट्या आयपीएलचे 14 सामने आयोजित करणार येणार असल्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
या खेळाडूंच्या जर्सीवर दारूची जाहिरात पाहून पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स भडकले
जगभरातील सर्वच कसोटी सामन्यात एकाच चेंडूचा वापर करावा; पहा कुणी केली मागणी
पाकिस्तानची पायाभरणी करणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा पणतू आहे आयपीएल संघाचा मालक
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही
आयपीएल २०२० : या ४ दिग्गज खेळाडूंना क्वचितच मिळू शकेल खेळण्याची संधी