भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना जिंकत भारतीय संघाने आपली प्रतिष्ठा राखली. ऑस्ट्रेलियाला १३ धावांनी पराभूत करत भारतीय संघाने आगामी टी२० मालिकेसाठी आत्मविश्वास कमावला. मागील दोन सामन्यात साफ अपयशी ठरलेल्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त कामगिरी करताना, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नियमित अंतराने बाद करत सामना भारताच्या पारड्यात टाकला. भारताच्या विजयाचा नायक या मालिकेत प्रथमच संधी मिळत असलेला मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर ठरला. शार्दुल ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद केले.
भारताने उभारली मोठी धावसंख्या
भारतीय कर्णधार विराट कोहली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अनुभवी सलामीवीर शिखर धवन लवकर बाद झाल्यानंतर, युवा शुबमन गिल व कर्णधार विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला. कर्णधार विराट कोली, हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांमुळे भारतीय संघाने ३०२ धावांची मजल मारली. भारताकडून सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने नाबाद ९२ धावांची सर्वोच्च खेळी केली.
भारतीय गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी
आधीच मालिका विजय मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या टी नटराजनने ऑस्ट्रेलियन सलामीवीर मार्नस लॅब्यूशाने याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाचे गडी नियमित अंतराने बाद होत गेले. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने ५९ धावांची खेळी करत सामन्यात रंग भरला. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेरच्या षटकात बुमराहने ऍडम झम्पाला बाद करत भारताला विजय मिळवून दिला.
शार्दुल ठरला हुकमी एक्का
भारताने या मालिकेत प्रथमच वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला संधी दिली. शार्दुलने संधीचे सोने करत ऑस्ट्रेलियाचे तीन महत्त्वपूर्ण बळी टिपले. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शतके झळकणाऱ्या स्टीव स्मिथला अवघ्या ६ धावांवर माघारी पाठवत, त्याने भारतीय गोलंदाजांवरील दडपण कमी केले. स्मिथ परतल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोझेस हेन्रीक्सने कर्णधार ऍरॉन फिंचसोबत चांगली भागीदारी बनवली होती. त्यावेळीही, शार्दुल भारतीय संघाच्या मदतीला धावून आला. शार्दुलने हेन्रीक्सला शिखर धवनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. अखेरीस, शार्दुलने अष्टपैलू सीन ऍबॉटला बाद करत भारताचा विजय पक्का केला. शार्दुलने आपल्या १० षटकांत ५१ धावा देत ३ बळी आपल्या नावे केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ४ डिसेंबरपासून तीन टी २० सामन्यांची मालिका सुरु होईल. मालिकेतील पहिले दोन सामने कॅनबेरा येथे, तर अखेरचा सामना सिडनी येथे खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
पंड्या-जडेजा जोडीची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध दीडशतकी भागीदारी करत मोडला १० वर्षापूर्वीचा रेकॉर्ड
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई