मुंबई । इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीए 2020) तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी लीगची तयारी सुरू केली आहे. कोरोना विषाणूमुळे 29 मार्चला होणारी आयपीएल लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आता युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. कोरोनामुळे सर्व क्रिकेटर्स घरी कुटूंबासोबत वेळ घालवत होते, परंतु अनलॉक प्रक्रिया सुरू होताच काही क्रिकेटपटूंनी मैदानी सराव सुरू केला. परंतु बहुतेक खेळाडू अजूनही घरीच आहेत. दिल्ली कॅपिटलचा सलामीवीर शिखर धवननेही मैदानी सरावास सुरुवात केली आहे.
नुकतेच रिषभ पंत, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, इशांत शर्मा यासारख्या काही क्रिकेटर्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओंमध्ये हे खेळाडू मैदानी प्रशिक्षण आणि नेट सराव करताना दिसले. यात अाता शिखर धवनही सामील झाला आहे. शिखर धवननेही नेटमध्ये जोरदार फलंदाजी करत आयपीएल 2020 ची तयारी सुरू केली.
शिखर धवनने आपल्या नेट प्रॅक्टिसचा हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. धवन स्ट्रेट ड्राईव्ह, स्विच हिट असे शॉट्स नेटवर खेळला. त्याची फलंदाजी पाहता असे म्हणता येईल की तो आयपीएलसाठी पूर्णपणे तयार आहे आणि तो फॉर्मात आहे. हा व्हिडिओ शेअर करताना धवनने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘बॅटवरील चेंडूचा आवाज आवडतो.’
https://www.instagram.com/p/CDTGOcsDcVf/?utm_source=ig_web_copy_link
दिल्ली कॅपिटल्सच्या अनुभवी खेळाडूने आयपीएलच्या शेवटच्या मोसमात 16 सामन्यांत 34.73 च्या सरासरीने आणि 135.67 च्या स्ट्राइक रेटने 521 धावा केल्या होत्या. यादरम्यान शिखर धवनने 5 अर्धशतकेही केली होती. गेल्या हंगामात सर्वाधिक धावा करणार्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या स्थानावर होता.
महत्त्वाच्या बातम्या –
-बकरी ईदच्या निमित्ताने पीसीबीने पाठवले पाकिस्तान संघाला ‘स्पेशल गिफ्ट’, पहा व्हिडिओ
-‘या’ ज्येष्ठ भाजप नेत्याच्या मुलाला सीके खन्ना ग्रुपचे समर्थन, बनणार दिल्ली क्रिकेटचा अध्यक्ष
-‘भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजी करू शकणार नाहीत’
ट्रेंडिंग लेख –
-जिगरी दोस्त असलेले क्रिकेटर झाले एकमेकांचे वैरी, पुढे…
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही