मुंबई । गतवर्षी दिल्ली कॅपिटल संघाने सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रथमच आयपीएल प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. आता यावेळी संघाला अधिक चांगल्या निकालाची अपेक्षा आहे. दिल्ली कॅपिटलचा कर्णधार श्रेयस अय्यर याने आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कर्णधार म्हणून सर्वात महत्त्वाची स्पर्धा असल्याचे सांगितले. त्याच्या मते, संघातील सर्व साथीदारांना सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. कारण एखाद्या खेळाडूच्या कामगिरीने काही फरक पडणार नाही.
श्रेयस अय्यर आयपीएल टी-20 डॉट कॉमला सांगितले की, “मागील हंगामापेक्षा हा हंगाम नक्कीच खूप वेगळा आहे, परंतु आव्हाने मला रोमांचित करतात. कर्णधार म्हणून नक्कीच ही माझी सर्वात महत्वाची स्पर्धा आहे, कारण परिस्थिती खूप वेगळी आहे. हे अगदी भिन्न असेल, यासाठी एका वेळी एका दिवसाबद्दल विचार करणे सर्वात महत्वाचे आहे.”
तो म्हणाला, ”आम्हाला प्रत्येक टप्प्यात काय करावे आणि काय करू नये हे सांगितले गेले आहे. कोव्हिड १९ संदर्भात नियमांचे पालन अनुसरण करणे, हे महत्त्वाचे ठरेल. तसेच एक विजेता संघ होण्यासाठी सर्व योग्य गोष्टी करणे आवश्यक आहे. पण आयपीएल ही एक मोठी स्पर्धा आहे आणि निकाल सतत खालीवर येत राहतात,” असे अय्यरनी सांगितले.
कोविड -१९ साथीच्या आजारामुळे जगातील सर्वात मोठ्या टी -20 लीगचा 13 वा हंगाम 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत आहे.
“एका खेळाडूच्या बळावर आयपीएलसारखी स्पर्धा जिंकता येत नाही. यासाठी संपूर्ण संघाला एकता दाखविणे आवश्यक आहे. गेल्या हंगामात आमच्यासाठी एक गोष्ट अशी होती की प्रत्येक प्रसंगी वेगवेगळे खेळाडू पुढे आले आणि ते आमच्या यशामध्ये महत्वाचे होते. या हे वर्षीही महत्त्वाचे ठरणार आहे, केवळ एका खेळाडूची सातत्यपूर्ण कामगिरीच नव्हे तर अनेक खेळाडूंच्या कामगिरीमुळे फरक पडेल,” असे श्रेयस अय्यरने सांगितले.
आयपीएल 2020 साठी दिल्ली कॅपिटल्स संघ
श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, इशांत शर्मा, अमित मिश्रा, आवेश खान, संदीप लामिछाने, कागिसो रबाडा, कीमो पॉल, मोहित शर्मा, ललिता यादव, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, मार्कस स्टोयनिस, ऋषभ पंत, एलेक्स कॅरी, शिमरॉन हेटमायर आणि तुषार देशपांडे
महत्त्वाच्या बातम्या –
‘ही’ गोष्ट घडली नसती तर एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला नसता
असा साजरा केला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आईचा ८३ वा वाढदिवस
टी२० क्रिकेटमध्ये झाली नव्या विश्वविक्रमाची नोंद, या अष्टपैलू क्रिकेटरने केलाय हा कारनामा
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार