मुंबई । ‘हवाई फायर’ करण्यात माहीर असलेला दिग्गज खेळाडू युवराज सिंगने आपल्या कारकिर्दीत काही ऐतिहासिक खेळी केल्या आहेत. तो एक उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जायचा. पण फलंदाज होण्याआधी युवराज सिंग हा एक वेगवान गोलंदाज देखील होता. याचा खुलासा नुकतेच त्याने केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने नुकतेच स्पोर्ट्सकिडाशी बोलताना सांगितले की, ‘2 षटकारांमुळे आपली आंतरिक शक्ती ओळखली आणि वेगवान गोलंदाजी करताना अष्टपैलू बनण्याचा विचार केला.’
तो म्हणाला, “मी पालममधील बिशनसिंग बेदींच्या शिबीरात गेलो होतो. त्यावेळी मी 11-12 वर्षांचा असावा आणि मी वेगवान गोलंदाज होतो. मी त्यावेळी फलंदाजी केली नव्हती. पण त्यावेळी सामन्यात फलंदाजीला गेलो आणि षटकार लगावला. यानंतर मी शतक केले. मी 90 धावांवर खेळत होतो आणि एकही षटकार लगावला नव्हता. मग डाव्या हाताचा फिरकीपटू आला तो बहुधा अंगद बेदी होता. मी त्याला दोन षटकार मारले. 11-12 वर्षांच्या वयात, आपल्याकडे इतकी शक्ती नसते.”
माजी अष्टपैलू युवराज म्हणाला, या दोन षटकारांमुळे माझ्या फलंदाजीच्या क्षमतेवर माझा विश्वास वाढला. त्यानंतर मी वेगवान गोलंदाज करताना अष्टपैलू होण्याचा विचार केला. तथापि, पाठीच्या दुखापतीमुळे मी वेगवान गोलंदाजीऐवजी फिरकीकडे वळलो. मी माझी बॅट फोडली पण मला आनंद आहे की हे घडले. कारण त्याशिवाय माझ्याकडे फलंदाजीची कौशल्य नसते.”
भारताला 2011 सालचा वनडे विश्वचषक मिळवून देण्यात युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत त्याने मालिकावीरचा पुरस्कार देखील पटकवला होता. तसेच 2007 च्या टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही युवराजचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलचे आयोजन यूएईत ३ ठिकाणी झाल्याने मॅच फिक्सिंगला बसेल आळा, पहा काय आहेत सुविधा
फक्त क्षेत्ररक्षणासाठी मिळाला होता मॅन ऑफ द मॅच, सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले नाव
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी माजी क्रिकेटरने केली टीम इंडियाची निवड; पाहा कोणा-कोणाला दिले स्थान
ट्रेंडिंग लेख –
युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश
२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद कायम रुसलेच
धीरज जाधव- गुणवत्ता असून देशासाठी खेळू न शकलेला महाराष्ट्राचा महारथी