आयसीसीचे माजी पंच स्टिव बकनर यांनी २००८ ला भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या सिडनी कसोटीत २ मोठ्या चूका झाल्याचे मान्य केेले आहे. तो कसोटी सामना अनेक गोष्टींमुळे वादग्रस्त ठरला होता.
त्या सामन्यात बकनर आणि मार्क बेन्सन हे दोन पंच होते. त्यांच्याकडून काही चूका झाल्या होत्या, ज्या भारतीय संघाच्या विरोधात होत्या. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला १२२ धावांनी पराभूत करत मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. या चूकांबरोबरच तो सामना अँड्र्यू सायमंड आणि हरभजन सिंग यांच्यात झालेल्या वादासाठीही कुप्रसिद्ध आहे.
या सामन्याच्या १२ वर्षांनंतर आता बकनर यांनी त्यांच्याकडून झालेल्या चूका मान्य केल्या असून त्यांनी म्हटले आहे की त्या चूकांमुळे भारताला कदाचीत सामना गमवावा लागला.
मिडडेशी बोलताना बकनर म्हणाले, “२००८ च्या सिडनी कसोटी सामन्यात मी दोन चुका केल्या. पहिली चूक, जेव्हा भारतीय संघ चांगली कामगिरी करत होता, तेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजाला शतकी खेळी करण्याची संधी दिली.
‘चूक क्रमांक २, जी पाचव्या दिवशी झाली. त्या चूकीच्या कारणास्तव बहुधा भारतीय संघाचा पराभव झाला. पाचव्या दिवशी दोन चुका झाल्या, परंतु मी पहिला पंच होतो का ज्याने कसोटी सामन्यात दोन चुका केल्या? आताही त्या चुका मला त्रास देतात.”
पुढे बकनर यांनी त्यांच्या चूकांचे स्पष्टीकरण देताना म्हटले की “चुका का होतात हे आपल्याला माहित असलेच पाहिजे. आपण पुन्हा तीच चूक करू इच्छित नसतो. मी काही स्पष्टीकरण देत नाही परंतु कधीकधी वाऱ्यासह आवाज निघून जातो. समालोचक स्टम्प माइकद्वारे आवाज ऐकतात. परंतु काही वेळी पंचांना तो आवाज ऐकू येत नाही. या अशा गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांना ठाऊक नाहीत.”
या कसोटी सामन्यात राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांना चूकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले होते. तर दुसरीकडे सायमंड्स आणि रिकी पाँटिंगला बाद दिले नव्हते. त्या सामन्यात सायमंड्सने पहिल्या डावात १६२ आणि दुसऱ्या डावात ६१ धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त त्याने ३ विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला होता.
परंतु या चूकांसाठी भारतीय संघाने बकनर आणि बेन्सन यांच्या विरुद्ध तक्रार केली होती. त्यामुळे सिडनी कसोटीनंतर झालेल्या पर्थ कसोटीतून बकनर आणि बेन्सन यांना काढून टाकण्यात आले होते. पर्थ कसोटी भारताने जिंकली होती. तर शेवटची ऍडलेडला झालेली कसोटी अनिर्णित राहिली होती. त्यामुळे ती मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने जिंकली होती.
ट्रेंडिंग घडामोडी –
या दिग्गजाच्या सल्ल्यामुळे राहुल द्रविड झाला कोच; बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा
इंग्लंडचा संघ धोक्यात; जर असे झाले तर कसोटी चॅम्पियनशिपमधून होणार बाहेर…






