नुकताच भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी ७.२९ वाजता धोनीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन सर्वांना आपल्या निवृत्तीची माहिती दिली. त्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र धोनीची चर्चा होत आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती सोशल मीडियाद्वारे धोनीला त्याच्या भविष्याबाबत शुभेच्छा देत आहेत. अनेक क्रिकेटपटूंनी धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील आठवणींनाही उजाळा दिला आहे. धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट तर संपली. पण, तो भविष्यात काय करणार? काही दिग्गजांप्रमाणे प्रशिक्षण किंवा समालोचनाचे क्षेत्र निवडणार, का लॉकडाऊनमध्ये केल्याप्रमाणे पुढेही शेती करणार?, असे वेगवेगळे प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहेत. Subramaniam Swamy Suggested MS Dhoni To Contest 2024 Lok Sabha Election
दरम्यान भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला राजकारण क्षेत्र निवडण्याचा सल्ला दिला आहे. सुब्रमण्यम यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत म्हटले की, “एमएस धोनी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे, इतर क्षेत्रातून नाही. अडचणींचा सामना करण्याचे त्याचे कौशल्य आणि संघाचे नेतृत्त्व करण्याची त्याची क्षमता, यांची सार्वजनिक जीवनात खूप आवश्यकता आहे. त्याने २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत उतरायला पाहिजे.”
M. S. Dhoni is retiring from Cricket but not from anything else. His talent-to be able to fight against odds and his inspiring leadership of a team that he has demonstrated in cricket is needed in public life. He should fight in LS General Elections in 2024.
— Subramanian Swamy (@Swamy39) August 16, 2020
३९ वर्षीय धोनीने क्रिकेट कारकिर्द खूप शानदार राहिली आहे. त्याने १५ वर्षे भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जरी धोनी इथून पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार नसला, तरी तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. १९ सप्टेंबरपासून युएईत सुरु होणाऱ्या आयपीएलच्या २०२०च्या तयारीसाठी धोनी चेन्नईला गेला आहे. लवकरच चेन्नई सुपर किंग्स युएईला रवाना होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
एमएस धोनीने या कारणामुळे घेतला निवृत्तीचा निर्णय, सुनील गावसकरांनी सांगितले कारण
सुरेश रैनाच्या निवृत्तीमुळे पत्नी प्रियंका झाली भावुक; म्हणते…
ट्रेंडिंग लेख –
आपल्या ‘पहिल्या प्रेमा’मुळे एमएस धोनीने घेतली भारताच्या स्वातंत्र्यदिनी निवृत्ती
ज्या शहरात पोरं आयआयटी, जीईई, यूपीएससीचा अभ्यास करायची, तिथलं जगच धोनीने बदललं