२०१३ च्या कॅरेबियन प्रेमियर लिगचा उपविजेता गयाना ऍमेझॉन वॉरियर्स आणि त्रिनिदाद व टोबॅगो रेड स्टिलने २०१४ च्या सत्राची सुरुवात विजयाने केली होती. आपल्या दुसऱ्या सामन्यांत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. त्रिनिदाद व टोबॅगो रेड स्टिलने प्रथम फलंदाजी करत फक्त ११८ धावा केल्या होत्या. त्यामुळे मार्टिन गुप्टील, लिंडेल सिमंस, मोहम्मद हाफिज व कर्णधार दिनेश रामदिन सारखे खेळाडु संघाता असल्याने गयाना ऍमेझॉन वॉरियर्सचा संघ सहज विजय मिळवेल असे दिसत होते पण बार्नवेल (३७) सिमंस (३२) व सुनिल नारायण (१६) वगळता कोणीही दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. ११८ धावा फटकावल्यानंतरही एकवेळ त्रिनिदाद व टोबॅगोचा संघ सामना जिंकेल असे दिसत होते पण शेवटच्या षटकांतील खराब क्षेत्ररक्षण त्रिनिदाद व टोबॅगोला चांगलेच महागात पडले आणि गयाना ऍमेझॉन वॉरियर्सचा निर्धारित २० षटकांत ११८ धावांपर्यंत पोहचला आणि सामना अनिर्णित राहिला.
दोन्ही संघ ११८ धावाच करु शकल्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागणार होता. गयाना ऍमेझॉन वॉरियर्सकडुन सर्वाधिक धावा काढणारा बार्नवेल व जेमी निशम सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीस आले होते. केवोन कुपरच्या पहिल्याच चेंडूवर बार्नेलने षटकार मारल्यानंतरही कुपरने गयाना ऍमेझॉन वॉरियर्सच्या संघाला ११ धावांवरच रोखले होते. त्यामुळे दोन्ही संघांना सामना जिंकण्याची समान संधी होती. ११८ धावा केल्यानंतरही सामन्यातील संघाचे पारडे क्षणाक्षणाला बदलत होते.
नासीर जमशेद, एविन लुईस, डॅरेन ब्राव्हो, ड्वेन ब्राव्होसारखे तगडे फलंदाज संघात असताना सामन्यांत १७ चेंडूत ३७ धावांची खेळी केलेल्या युवा निकोल्स पुरनला रॉस टेलरसोबत सुपर ओव्हरमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना धाडण्यात आले होते. तर गयाना ऍमेझॉन वॉरियर्सचा कर्णधार दिनेश रामदिनने गोलंदाजीची धुरा दिली होती ती सुनिल नारायणवर.
समोर फिरकी गोलंदाज दिसताच पुरन पहिल्या चेंडूपासुन मोठा फटका खेळण्याच्या इराद्याद दिसत होता पण मोठा फटका तर सोडाच पुरनला चेंडूला बॅट लावणे देखील जमत नव्हते. जस जसे चेंडू निर्धाव जात होते तसे त्रिनिदाद व टोबॅगो रेड स्टिल संघावरील दडपण वाढत होते. पुरन सोबत फलंदाजीला आलेल्या अनुभवी रॉस टेलरने पुरनला काही गोष्टी सांगितल्या पण त्यानंतरही पुरन चेंडूला बॅट लावण्यासाठी तडफडतच होता. शेवटी सुपर ओव्हर मधील ५ व्या चेंडूवर पुरन सीमारेषेवर उभ्या असलेल्या मार्टिन गुप्टीलकडे झेल देऊन परतला. १२ धावांचा पाठलाग करताना त्रिनिदाद व टोबॅगो रेड स्टिल एकही धाव काढता आली नाही आणि गयाना ऍमेझॉन वॉरियर्सने सलग दुसरा विजय मिळवला होता.
एकीकडे टी-२० क्रिकेट म्हंटले की फलंदाजांचा बोलबाला असतो पण त्यातही फिरकी गोलंदाज सुनिल नारायणने निर्धाव षटक टाकले ते ही सुपर ओव्हर मध्ये.