नवी दिल्ली| श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या जीवनावर लवकरच बायोपीक बनणार आहे. हा बायोपिक भारतात बनणार आहे. मात्र, या चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताच हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटात मुरलीधरनची भूमिका साकारणारा तामिळ अभिनेता विजय सेतुपती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. श्रीलंकेच्या झेंड्यासह या अभिनेत्याला पाहून चाहत्यांना राग आला. त्यामुळे या पोस्टरला चाहत्यांनी नापसंत केले आहे.
श्रीलंकेत तामिळ भाषिकांवर झाले होते अत्याचार
वास्तविक, श्रीलंकेत तमिळ अल्पसंख्याक आहेत. तेथे अनेक वर्षांपासून सिंहली भाषिक लोक तामिळ भाषिकांवर अत्याचार करत आहे. 1983 ते 2009 या काळात श्रीलंकेत गृहयुद्ध झाले होते. त्यामध्ये अनेक तामिळ लोक मारले गेले होते. त्यानंतर अनेक तामिळ भाषिक लोकांनी भारतात स्थानांतर करायला सुरुवात केली. त्यामुळे या बायोपीकच्या अनुशंगाने लोक म्हणने आहे की श्रीलंकेत तामिळ लोकांना इतकी वाईट वागणूक दिल्यानंतरही मुरलीधरनच्या बायोपीकमध्ये विजय सेतुपती का काम करतोय. तसेच या बायोपीकवर बंदी आणण्याचीही मागणी होत आहे.
सेतुपतीची निवड एकमतानेच
चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 13 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्याआधी या बायोपीकचे मोशन पोस्टर स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ या चॅनेलवर रिलीज करण्यात आले. श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन म्हणाला की, ‘विजय सेतुपतीची बायोपीक ‘800’ साठी झालेली निवड एकमताने करण्यात आली. मला विश्वास आहे की हा तमिळ अभिनेता माझ्या भूमिकेला न्याय देईल.’
बायोपीकमध्ये काम करण्याचा अभिमान
गेल्या आठवड्यात सेतुपतीने सांगितले की, “मुरलीधरनच्या बायोपीकमध्ये काम करण्याचा मला अभिमान वाटतो. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 बळी घेतले आहेत, म्हणून चित्रपटाला “800” असे नाव देण्यात आले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
-ऐकलंत का मंडळी! महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारणार ‘हा’ तमिळ स्टार
-८०० विकेट घेणाऱ्या मुरलीधरनला ८० विकेट्सही या कारणाने नसत्या आल्या घेता
‘मला जाऊ द्या ना घरी’ लावणीवर विराटचा ठेका, पाहा जबरदस्त मीम्स
ट्रेंडिंग लेख –
-मुरलीधरनला ‘फेकी गोलंदाज’ ठरवणारे डॅरेल हेयर
काळा डाग! ‘आयपीएल’ इतिहासातील पाच घटना ज्यामुळे स्पर्धेची जगात बदनामी झाली
आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर