वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज गोलंदाज झाले आहेत. ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, शोएब अख्तर, वकार युनूस, वसीम अक्रम, झहीर खान असे दिग्गज गोलंदाज वनडे क्रिकेटमध्ये होऊन गेले. वनडे सामन्यात गोलंदाजांनी अनेक वेळा स्वत: च्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला आहे.
वनडे सामन्यात एका गोलंदाजाला केवळ १० षटके दिली जातात आणि त्यात अधिक बळी मिळवणे कोणत्याही गोलंदाजासाठी सोपे काम नसते. परंतु, असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांनी वनडे सामन्यात अनेक बळी घेतले आहेत आणि या गोलंदाजांनी त्यांच्या बळींची संख्या वेगाने पुढे नेली आहे.
या लेखात अशा ३ गोलंदाजांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी वनडेमध्ये जलद गतीने ४०० बळी घेतले आहेत.
३. वसीम अक्रम (Wasim Akram)
या यादीत तिसर्या क्रमांकावर पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज आणि स्विंगचा सुलतान वसीम अक्रम आहे. वसीम अक्रमने अवघ्या २८५ वनडे सामन्यात ४०० बळी घेतले. १९ जानेवारी २००० रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी येथे वसीम अक्रमने ४०० बळी पूर्ण केले. त्याने वनडेत एकूण ५०२ बळी घेतले आहेत.
२. मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan)
श्रीलंकेचा माजी अनुभवी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने २६३ वनडे सामन्यात ४०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. २४ जानेवारी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली.
मुथय्या मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी घेतले आहेत. तो कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे आणि त्याने वनडेमध्ये ५३४ विकेट्स घेतल्या आहेत.
१. वकार युनूस (Waqar Younis)
या यादीत पाकिस्तानचा माजी अनुभवी गोलंदाज वकार युनूसचा पहिला क्रमांक आहे. वकार युनूस आणि वसीम अक्रमची जोडी बरीच लोकप्रिय होती. जेव्हा हे गोलंदाज स्वतःच्या लयीमध्ये होते तेव्हा त्यांचा सामना करणे कोणत्याही संघाला सोपे नव्हते. वकार युनूसने अवघ्या २५२ सामन्यात ४०० बळी मिळवले होते. ८ डिसेंबर २००२ रोजी डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने हा पराक्रम केला होता.
त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण ४१६ वनडे विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज…
भारतीय फुटबॉलचा आधारस्तंभ – सुनील छेत्री
जेव्हा क्रिकेटपटूंनी भरलेले जहाज भयानक तूफानामुळे बुडाले, झाला होता अनेक क्रिकेटर्सचा मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या –
‘धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही’ इंग्लंडच्या खेळाडूने केली धोनीची प्रशंसा…
रैनाने म्हटले रोहितच पुढचा धोनी, तर रोहितने दिले ‘हटके’ प्रत्युत्तर
लॉकडाऊनमध्ये कोणाबरोबर रहायला आवडेल?, ‘या’ खेळाडूने घेतले धोनीचे नाव…